AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय राऊतांच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, देवच मालक आहे , नेमकं काय झालं?

संजय राऊत यांनीही वानखेडेंवर निशाणा साधत त्यांना एकप्रकारे इशाराच दिलाय. याच मुद्द्यावरुन संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलीय. फडणवीस हे खंडणीखोर अधिकाऱ्याती तरफदारी करत असल्याचं राऊत म्हणाले. राऊतांच्या या टीकेला आता फडणवीस यांनीही प्रत्युत्तर दिलंय.

संजय राऊतांच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, देवच मालक आहे , नेमकं काय झालं?
देवेंद्र फडणवीस, संजय राऊत
| Edited By: | Updated on: Oct 27, 2021 | 3:43 PM
Share

नवी दिल्ली : मुंबई क्रुझ ड्रग्स आणि आर्यन खान प्रकरणावरुन महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी आरोपांची मालिका सुरु केलीय. तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही वानखेडेंवर निशाणा साधत त्यांना एकप्रकारे इशाराच दिलाय. याच मुद्द्यावरुन संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलीय. फडणवीस हे खंडणीखोर अधिकाऱ्याती तरफदारी करत असल्याचं राऊत म्हणाले. राऊतांच्या या टीकेला आता फडणवीस यांनीही प्रत्युत्तर दिलंय. (Devendra Fadnavis reply to Sanjay Raut’s criticism on Sameer Wankhede case)

‘संजय राऊत हे ड्रग्सवाल्यांची वकिली करत आहेत का? मुंबईला आणि महाराष्ट्राला ज्या प्रकारे ड्रग्सचा विळखा पडलेला आहे. ज्याप्रकारे आमची तरुणाई बरबाद होतेय. त्या विरुद्ध लढण्याऐवजी जर संजय राऊत यांना समर्थन देत असतील तर मला असं वाटतं की देवच मालक आहे, ती परिस्थिती असणार आहे. कारण, मला त्यांना उत्तर देण्याचीही इच्छा नाही. त्यांना केवळ राजकारण करायचं आहे. संजय राऊत यांचा उद्देश हाच आहे की मूळ मुद्द्यांपासून सगळं भटकलं गेलं पाहिजे. मूळ मुद्द्यावर चर्चाच होऊ नये. संजय राऊत साहेब कधीही शेतकऱ्यांबद्दल चकार शब्द बोलत नाहीत. मराठवाड्यात इतका भयानक पाऊस झाला, शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट झाली. शेतकऱ्यांना एक नवा पैसा मिळत नाही. त्याही बद्दल एक शब्द या ठिकाणी बोलत नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं की मी त्यांना काय उत्तर देऊ’, असा पलटवार फडणवीस यांनी संजय राऊतांवर केलाय.

खंडणीखोरांसाठी विरोधी पक्षनेत्यांची वकिली – राऊत

तपास यंत्रणांचा वापर हा केंद्राचा महाराष्ट्र सरकार विरोधातील कट आहे. स्वतः मुख्यमंत्रीही तेच सांगत आहेत. महाराष्ट्रात सरकार आले नाही याचा राग काढला जात आहे. महाराष्ट्राचा कणा ताठ आहे, कुणापुढे झुकणार नाही, असंही संजय राऊत म्हणाले. गेल्या काही काळात एनसीबीनं अनेक प्रकरणे केली. रिया चक्रवर्ती प्रकरणात काय झाले ? एका प्रकारे खंडणीखोरी आहे. अशा खंडणीखोरांसाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते वकिली करतात हे दुर्दैव आहे. फडणवीस यांच्यासारख्या सुसंस्कृत नेत्याचे होत असलेलं अधःपतन मला बघवत नाही, असं राऊत म्हणाले.

जलयुक्त शिवारला क्लीन चिट, फडणवीसांची प्रतिक्रिया काय?

राज्य सरकारने नेमलेल्या समितीकडून देवेंद्र फडणवीस यांची महत्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवारला क्लीन चिट देण्यात आलीय. त्यावर बोलताना ‘मला अतिशय आनंद होतोय. कारण ही जनतेची योजना आहे, जनतेने राबवलेली योजना आहे. यापूर्वी माननीय उच्च न्यायालयाने एक तज्ज्ञ समिती नेमली होती. देशभरातील तज्ज्ञ त्यात होते. त्या समितीने ही योजना कशी योग्य आहे आणि कसं योग्य काम यात झालं आहे, असा एक अहवालही त्या समितीने दिला होता. तो अहवालही उच्च न्यायालयाने स्वीकारला होता. त्यामुळे आता हा जो अहवाल आला आहे, तो त्याला अनुरुप असेल. हे खरं आहे की यात काही तक्रारी असू शकतात, मी स्वत: सांगितलं होतं की 600 वेगवेगळ्या तक्रारी आहेत, त्याती चौकशी केली जाईल आणि ती चौकशी झाली पाहिजे. मला असं वाटतं की 6 लाख कामांमधील 600 कामांची चौकशी ही फार मोठी गोष्ट नाही. ज्या चुकीच्या गोष्टी झाल्या असतील त्याचं मी समर्थन करणार नाही. पण त्यामुळे या संपूर्ण योजनेला बदनाम करणं, हे पूर्ण चुकीचं आहे’, असं फडणवीस म्हणाले.

इतर बातम्या :

समीर वानखेडेंच्या अडचणी वाढणार? एनसीबीविरोधात अजून एक पंच समोर, कोऱ्या कागदावर सह्या घेतल्याचा दावा

‘मिस्टर फडणवीसांकडून खंडणीखोर सैतानाची तरफदारी’, दादरा नगर-हवेलीत संजय राऊतांचा पलटवार

Devendra Fadnavis reply to Sanjay Raut’s criticism on Sameer Wankhede case

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.