‘उठा उठा आषाढी आली, ‘स्वबळावर’ गाडी चालवत पंढरीला जायची वेळ आली’, सदाभाऊ खोतांची खोचक टीका

मुख्यमंत्री स्वत: ड्रायव्हिंग करत पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाले आहेत. त्यावरुन भाजपसह अन्य विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केलीय. रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनीही मुख्यमंत्र्यांना जोरदार टोला लगावला आहे.

'उठा उठा आषाढी आली, 'स्वबळावर' गाडी चालवत पंढरीला जायची वेळ आली', सदाभाऊ खोतांची खोचक टीका
उद्धव ठाकरे, सदाभाऊ खोत
Follow us
| Updated on: Jul 19, 2021 | 6:35 PM

मुंबई : आषाढी एकादशीला होणाऱ्या विठ्ठलाच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. थोड्याच वेळात ते पंढरपूरमध्ये पोहोचतील. खराब हवामान आणि मुसळधार पावसामुळे विमानानं जाणं शक्य नसल्यामुळे मुख्यमंत्री रस्तेमार्गानेच पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री स्वत: ड्रायव्हिंग करत पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाले आहेत. त्यावरुन भाजपसह अन्य विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केलीय. रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनीही मुख्यमंत्र्यांना जोरदार टोला लगावला आहे. (Sadabhau Khot criticizes CM Uddhav Thackeray, Uddhav Thackeray drove to Pandharpur)

उठा उठा आषाढी आली, ‘स्वबळावर’ गाडी चालवत पंढरीला जायची वेळ झाली, अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका केलीय. खोत यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. नेहमीच्या मर्सिडीज ऐवजी रेंज रोव्हर गाडी घेऊन मुख्यमंत्री पंढरपूरकडे रवाना झाले. ही गाडी आदित्य ठाकरे वापरत असतात. पण सध्या पावसाचा धोका, तुंबलेलं पाणी यामुळे उंच गाडी हवी, म्हणून मुख्यमंत्री ते वापरत असलेली मर्सिडीज ऐवजी आदित्य ठाकरे वापरत असलेले रेंज रोव्हर गाडी घेऊन पंढरपूरकडे रवाना झाले.

निलेश राणेंचा जोरदार प्रहार

‘जो माणूस महाराष्ट्र हातात येऊन चालू शकला नाही, तो माणूस गाडी चालवत मुंबईबाहेर गेला तर त्यात काय मोठा पराक्रम??? विठ्ठलाची कितीही सेवा केली तरी या मुख्यमंत्र्याला विठ्ठल माफ करणार नाही. कारण, इतक्या सहजपणे महाराष्ट्राची वाट लावणाऱ्या व्यक्तीला माफी नाही’, अशा शब्दात निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार प्रहार केलाय.

केशव उपाध्येंचीही टीका

भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही ट्वीटरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्ला चढवलाय. ‘जनतेचे जिणे हराम, मुख्यमंत्र्यांचे घरातून काम. पावसाने मुंबईचा चक्का जाम, मुख्यमंत्र्यांचे घरातूनच काम. एमपीएससी विद्यार्थ्याचा जीवनाला रामराम, तरीही मुख्यमंत्र्यांचे घरातूनच काम. तुका म्हणे माझा विठ्ठल झाकोळला. वारकरी भक्तांना बसवुनी घरी, फोटोमध्ये झळकती मुख्यमंत्री…’ अशा ओळीद्वारे उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केलीय.

संबंधित बातम्या : 

नेहमीची मर्सिडीज नाही, आदित्य ठाकरेंची रेंज रोव्हर दिमतीला, तुफान पावसात मुख्यमंत्री पंढरपूरच्या दिशेने

मातोश्री ते पंढरपूर, उभ्या पावसात स्वत: ड्रायव्हिंग, बाजूला रश्मी ठाकरे, मुख्यमंत्री पंढरपूरकडे रवाना

Sadabhau Khot criticizes CM Uddhav Thackeray, Uddhav Thackeray drove to Pandharpur

Non Stop LIVE Update
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.