AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashok Chavan : मला संपवायचा होता प्रयत्न, माजी मुख्यमंत्र्यांच्या दाव्याने राज्यात खळबळ!

माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. मला संपवण्याचा प्रयत्न केला जात होता, असा खळबळजनक आरोपही यावेळी त्यांनी केला.

Ashok Chavan : मला संपवायचा होता प्रयत्न, माजी मुख्यमंत्र्यांच्या दाव्याने राज्यात खळबळ!
ashok chavan
| Updated on: Sep 14, 2025 | 8:34 PM
Share

Ashok Chavan : कधीकाळी काँग्रेसची विचारधारा मराठवाड्यात रुजवणारे खासदार अशोक चव्हाण आज भाजपात आहे. तब्बल 14 वर्षे ते काँग्रेसमध्ये होते. या काळात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपदही भूषवले आता मात्र ते याच काँग्रेसवर सडकून टीका करताना दिसतात. असे असतानाच आता त्यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. 14 वर्षे मी वनवासात होतो. मला संपवण्याचा प्रयत्न केला जात होता, असा मोठा दावा अशोक चव्हाण यांनी केला आहे.

लातूरकरांनी धक्का तंत्र वापरत…

अशोक चव्हाण लातूरमध्ये एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस तसेच विरोधकांच्या आघाडीवर टीका केली. लातूरला या अगोदर येण्याची संधी अनेकदा मिळाली. पण अत्यंत प्रेमाने आजचे निमंत्रण मिळाले. सध्या राजकीय समीकरणे बदलली आहेत. आज या सभेत मी या बदललेल्या समिकरणाचे चित्र पाहतो आहे. देवेंद्र फडणवीस यांचे निवडणूक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण होईल. लातूरकरांनी धक्का तंत्र वापरत आमदार रमेश कराड यांना लातूर ग्रामीणमधून निवडणून आले लातूर जिल्ह्यातल्या सहा पैकी पाच जागा महायुतीने जिंकल्या हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्मा आहे, असे गौरवोद्गार अशोक चव्हाण यांनी यावेळी काढले.

मोदी, फडणवीस साहेबांशी चर्चा करून…

तसेच, नांदेडलादेखील आम्ही अनेक सहकाऱ्यांनी एकत्र येत नऊच्या नऊ जागा जिंकल्या. मी आयुष्यातले 14 वर्षे वनवासात होतो. मला संपवायचा प्रयत्न होत होता. त्यामुळेच मी निर्णय घेतला. मोदी, फडणवीस साहेबांशी चर्चा करून भाजपत गेलो, असे यावेळी चव्हाण यांनी सांगितले. तसेच मागच्या काळात जेव्हढे प्रयत्न काँग्रेससाठी केले तेव्हढेच प्रयत्न आम्ही भाजपासाठी करू, असे आश्वासनही त्यांनी दिले. चांगले उमेदवार द्या लोक त्यांना निवडून देतील. UPA ची काय अवस्था झाली आपण पाहतो आहोत, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केली.

…त्यामुळं लोक आता भाजपासोबत येत आहेत

कालच्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवेळी विरोधकांची मते फुटली. तुम्ही लोकांना काहीही देऊ शकत नाही. त्यामुळं लोक आता भाजपासोबत येत आहेत. पाशा पटेल आता आमचे मित्र झाले आहेत. मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी मोदी यांचा वाढदिवसदेखील आहे. या निमित्ताने त्यांचे काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, असे आवाहनही यावेळी अशोक चव्हाण यांनी केले.

'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.