बीडमध्ये मोठी उलथापालथ, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश

बीड जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व अंबाजोगाई नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजकिशोर (पापा) मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मोदी यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यामुळे बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार असून येथील राजकीय समिकरणं बदलणार आहेत.

बीडमध्ये मोठी उलथापालथ, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश
ncp ajit pawar


मुंबई : बीड जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व अंबाजोगाई नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजकिशोर (पापा) मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मोदी यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यामुळे बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार असून येथील राजकीय समिकरणं बदलणार आहेत. या पक्षप्रवेशामुळे अंबाजोगाई नगरपालिकेसह केज विधानसभेतही राष्ट्रवादी एकहाती विजय मिळवेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

मोदी यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

राजकिशोर मोदी यांच्यासह त्यांचे अनेक सहकारी व पदाधिकाऱ्यांनीदेखील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील मनसेचे जिल्हापरिषद सदस्य विजय चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील आज मुंबई येथील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

जुने तसेच नव्यांना सोबत घेऊन काम करु

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे पक्षात स्वागत केले. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला आहे. आज नव्याने पक्षप्रवेश झालेले पापा मोदी व त्यांच्या सहकाऱ्यांची विचारसरणीदेखील समान आहे. त्यामुळे पक्षाच्या वाईट काळात सोबत राहिलेल्या जुन्या कार्यकर्त्यांवर कोणताही अन्याय होऊ न देता, जुने व नवे अशा सर्वांनाच सोबत घेऊन जिल्ह्यात एकजुटीने पक्षावाढीसाठी काम करू असे आवाहन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी केले.

पक्षप्रवेश सोहळ्यास दिग्गज नेत्यांची अपस्थिती

यावेळी कार्यक्रमाला पक्षाचे आमदार सतीश चव्हाण, आमदार संजय दौंड, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार बाळासाहेब आजबे, प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील, माजी आमदार पृथ्वीराज साठे तसेच अन्य मोठे नेते उपस्थित होते.

इतर बातम्या :

विमा कंपन्या शेतकऱ्यांशी अडेलतट्टूपणे वागत असतील तर गुन्हे दाखल करायला मागेपुढे पाहणार नाही, अजितदादांचा इशारा

गडकरी-फडणवीसांचा 36 चा आकडा, वडेट्टीवारांचा दावा, गडकरी म्हणतात, देवेंद्र भावासारखे…

दीड वर्षाच्या बाळाला बस स्टँडवर सोडून जन्मदात्री निघून गेली, अशी कशी आई देव लेकराला देते?

(Beed district senior Congress leader Rajkishor Modi has joined NCP in presence of jayant patil and sharad pawar)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI