भाजपची सत्ता नसलेल्या राज्यातील नागरिकांना मोफत कोरोना लस नाही का? शिवसेनेचा सवाल

कोरोनाची लस अजून आली नाही तरीही भाजपकडून त्याचा निवडणूक प्रचारासाठी वापर केला जात आहे. | Bihar Election

भाजपची सत्ता नसलेल्या राज्यातील नागरिकांना मोफत कोरोना लस नाही का? शिवसेनेचा सवाल

मुंबई: बिहार विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपने मतदारांना कोरोनाची मोफत लस देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आता राजकारण तापले आहे. भाजपच्या जाहीरनाम्यात सत्ता आल्यास बिहारमधील प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची मोफत लस देऊ, असे आश्वासन देण्यात आले आहे. याचा अर्थ भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांतील लोकांना कोरोनाची लस मिळणार नाही का, असा सवाल शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी उपस्थित केला.


भाजपकडून गुरुवारी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. बिहारमधील प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची लस मोफत देणे, हे आमचे प्रमुख आश्वासन असल्याचे यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर प्रियंका चतुर्वेदी यांनी भाजपवर टीकेची तोफ डागली. कोरोनाची लस अजून आली नाही तरीही भाजपकडून त्याचा निवडणूक प्रचारासाठी वापर केला जात आहे. कोरोनाच्या लसीच्या वाटपासंदर्भात केंद्र सरकारने सर्व राज्यांना समान वागणूक द्यायला नको का, असा सवाल प्रियंका चतुर्वेदी यांनी भाजपला विचारला.


बिहारचा जीडीपी वाढवून दाखवला, सीतारामन यांनी स्वतःचीच पाठ थोपटली
राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सरकारच्या काळात बिहारच्या जीडीपीमध्ये लक्षणीय वाढ झाली, असे सांगत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भाजपची पाठ थोपटली. ‘एनडीए’च्या 15 वर्षांच्या कार्यकाळात बिहारचा जीडीपी 3 टक्क्यांवरून 11.3 टक्क्यांवर गेला. बिहारमध्ये जंगलराज असते तर हे शक्य झाले नसते. एनडीए सरकारने सुशासनाला प्राधान्य दिल्यामुळेच बिहारचा हा विकास शक्य झाला, असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

सत्ता दिल्यास मोफत लस देऊ; बिहार निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपचं आश्वासन

COVID Vaccine | कोव्हिड लस सर्वात आधी कोणाला मिळणार? केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचं उत्तर

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI