‘..तेव्हा संजय राऊत बाथरुममध्ये लपले होते’, नितेश राणेंचा हल्लाबोल

भाजपचा अंतकाळ जवळ आला आहे, अशी घणाघाती टीका आजच्या सामना अग्रलेखातून संजय राऊत यांनी केलीय. त्यावरुन भाजप आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतांना थेट इशारा दिलाय. तसंच राऊतांवर जोरदार हल्लाही चढवला आहे.

'..तेव्हा संजय राऊत बाथरुममध्ये लपले होते', नितेश राणेंचा हल्लाबोल
...तर भाजप कार्यकर्त्याशी गाठ!
Follow us
| Updated on: Aug 02, 2021 | 2:32 PM

मुंबई : भाजप आणि प्रसाद लाड यांची सेनाभवन फोडण्याची भाषा आणि संजय राऊत यांच्या सामनातील अग्रलेखात भाजपमधील नेत्यांवर केलेली टीका, यावरुन राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप असं जोरदार राजकारण आता रंगताना दिसत आहे. भाजपमध्ये उपऱ्यांना, बाटग्यांना स्थान नव्हतं. पण आता मूळ विचारांचे लोक भंगारात व बाटगे पालखीत बसवून त्यांना नाचवले जात आहे. त्यामुळेच या पक्षाचा अंतकाळ जवळ आला आहे, अशी घणाघाती टीका आजच्या सामना अग्रलेखातून संजय राऊत यांनी केलीय. त्यावरुन भाजप आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतांना थेट इशारा दिलाय. तसंच राऊतांवर जोरदार हल्लाही चढवला आहे. (BJP MLA Nitesh Rane criticizes Shivsena MP Sanjay Raut)

संजय राऊत यांनी सामना अग्रलेखात अन्य पक्षातून भाजपमध्ये येणाऱ्यांसाठी बाटगे हा शब्द वापरल्यानं नितेश राणे यांनी राऊतांवर जोरदार निशाणा साधलाय. महामंडळं, पदं सगळ्या खास लोकांना. बाळासाहेबांचे निष्ठावंत दिसले नाहीत. बाटग्यांच्या माध्यमातून चालणारी शिवसेना आहे, असं प्रत्युत्तर नितेश राणे यांनी दिलंय. तसंच नारायण राणे यांनी सेना सोडली तेव्हा सामना समोरच्या सभेत संजय राऊत बाथरुममध्ये लपले होते. समोर आले तर ततपप होतं होतं आणि आता धमक्यांची भाषा वापरली जातेय. आम्ही खांद्यावर बंदूक ठेवत नाही. सेनाभवन आणि बाळासाहेबांबद्दल आदर आहे, अशा शब्दात नितेश राणे यांनी राऊतांवर हल्ला चढवलाय.

‘लोकप्रभामध्ये राऊतांनी बाळासाहेबांसाठी काय भाषा वापरली होती?’

लोकप्रभामध्ये असताना संजय राऊतांनी बाळासाहेबांसाठी काय भाषा वापरली होती ते पाहावं. नाहीतर मी पत्रकार परिषद घेऊन सांगतो की त्यांनी काय म्हटलं होतं. संजय राऊतांनी जेवढ्यास तेवढं राहावं नाहीतर कुंडली काढू, असा इशाराही नितेश राणेंनी दिलाय. शिवसेनेबद्दल आकस नाही. समोरुन टीका टिप्पणी होत असेल तर गप्प बसणार नाही. संजय राऊत हे शरद पवार यांचं काम करतात. त्यांना शिवसेनेशी काही देणंघेणं नाही, असा टोलाही त्यांनी लगावलाय.

‘आरे ला कारे करायला आम्ही मागेपुढे पाहणार नाही’

प्रसाद लाड यांच्याबद्दल बोलताना शाखाप्रमुख उत्तर देतील असं तुम्ही बोलता. मग कॉन्ट्रॅक्ट देताना हे शाखाप्रमुख कुठे जातात? त्यांना काय देता? असा खोचक सवालही नितेश राणे यांनी शिवसेनेला विचारलाय. मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांना सोबत घेऊन न्याय देण्याचा प्रयत्न करावा. प्रसाद लाड यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामुळे विषय संपलाय. आता मुंबईच्या समस्यांबाबत बोला. नाहीतर आरे ला कारे करायला आम्ही मागेपुढे पाहणार नाही, असा इशाराही नितेश राणे यांनी यावेळी दिलाय.

संबंधित बातम्या :

“भाजपमध्ये उपऱ्यांना स्थान नव्हतं, पण आता बाटगे पालखीत आणि मूळ लोक भंगारात, भाजपचा अंतकाळ जवळ आलाय”

“सेना भवनापर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर याल, पण जाताना कदाचित खांद्यावरच जावं लागेल, खांदेकरी घेऊन या”

BJP MLA Nitesh Rane criticizes Shivsena MP Sanjay Raut

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.