मुंबई : भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सलग तिसरं पत्र लिहिलं आहे. तिसऱ्या पत्राच्या माध्यमातून त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्याच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेऊन मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली आहे. ‘मुख्यमंत्री होऊन 22 महिने उलटले तरी उस्मानाबाद जिल्ह्याच्या अति महत्वाच्या विषयांकडे ठाकरे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. आजवर जिल्ह्यातील विकास कामांबाबत आपण एकही व्यापक बैठक घेतलेली नाही’, असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.