AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीव्ही 9 च्या बातमीवर शिक्का : भाजपकडून शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदासह 16 मंत्रिपदांची ऑफर

भाजपने मुख्यमंत्रिपदा नाही, तर उपमुख्यमंत्रिपद (BJP offer Deputy Chief Minister to Shivsena) आणि 16 मंत्रिपदे देण्याचा प्रस्ताव दिल्याचं वृत्त टीव्ही 9 मराठीने 29 ऑक्टोबर रोजी दिलं होतं.

टीव्ही 9 च्या बातमीवर शिक्का : भाजपकडून शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदासह 16 मंत्रिपदांची ऑफर
| Updated on: Nov 06, 2019 | 10:31 AM
Share

मुंबई : भाजपने शिवसेनेला दिलेल्या प्रस्तावाच्या टीव्ही 9 मराठीच्या वृत्तावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे.  भाजपने मुख्यमंत्रिपदा नाही, तर उपमुख्यमंत्रिपद (BJP offer Deputy Chief Minister to Shivsena) आणि 16 मंत्रिपदे देण्याचा प्रस्ताव दिल्याचं वृत्त टीव्ही 9 मराठीने 29 ऑक्टोबर रोजी दिलं होतं. भाजपच्या (BJP offer Deputy Chief Minister to Shivsena) कोअर कमिटीची काल बैठक झाली, या बैठकीतही याच प्रस्तावावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात भाजपकडून शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदासह 16 मंत्रिपदं देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यासोबतच केंद्रात एक वाढीव कॅबिनेट मंत्रिपद देण्यात येईल. तसेच राज्यातील महत्त्वाची दोन मंत्रिपद शिवसेनेला देण्याची तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यात अर्थमंत्री, कृषीमंत्री, गृहराज्यमंत्रीपद शिवसेनेला देऊ, असे भाजपकडून सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेला 16 विविध मंत्रिपदाची ऑफरही देण्यात आली आहे.

मात्र भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्यास स्पष्ट नकार दर्शवला आहे. त्याशिवाय शिवसेनेला गृहमंत्री, महसूल मंत्री, नगरविकास मंत्री ही महत्त्तवाची खाती सोडण्यासही भाजपने नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली (BJP offer Deputy Chief Minister to Shivsena) आहे.

देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री : भाजप

दरम्यान भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना माहिती दिली. देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्त्वात महाराष्ट्रात सरकार स्थापन होईल, असं ते म्हणाले. शिवसेनेकडून अद्याप प्रस्ताव आला नसल्याचं त्यांनी सांगितलं.

शिवसेनेला प्रस्ताव दिला आहे, कोणत्याही क्षणी गोड बातमी: सुधीर मुनगंटीवार 

भाजपने शिवसेनेला प्रस्ताव दिला आहे. आता शिवसेनेच्या प्रस्तावाची वाट पाहात आहोत. कोणत्याही क्षणी गोड बातमी मिळू शकते, अशी माहिती मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar on Government Formation) यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात झालेल्या या बैठकीला चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, पंकजा मुंडे हे प्रमुख नेते उपस्थित होते.

सेना-भाजप बैठक रद्द

दरम्यान मुख्यमंत्रिपदाच्या बोलणीसाठी 29 ऑक्टोबरला दुपारी 4 वाजता मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती. यात शिवसेनेकडून सुभाष देसाई, संजय राऊत आणि भाजपकडून भूपेंद्र यादव, प्रकाश जावडेकर यांच्यात याबाबतची बोलणी होणार होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या विधानामुळे शिवसेनेने बोलणी थांबवली आहे. यामुळे ‘मातोश्री’ मुख्यमंत्र्यांवर नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं (Shivsena Bjp Meeting Cancelled) आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा कोणताही फॉर्म्युला ठरला नाही. शिवसेनेला 5 वर्षांसाठी स्वत:कडे मुख्यमंत्रीपद असावं असं वाटू शकतं. पण वाटणं आणि होणं यात फरक आहे, असे विधान मुख्यमंत्र्यांनी केले होते. या विधानामुळे शिवसेनेकडून ही बैठक रद्द करण्यात आली आहे.

सत्तास्थापनेचं गणित

भाजपने 105 जागांसह (Independent MLA Shankarrao Gadakh support  Shiv Sena) सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. मात्र कोणत्याही एका पक्षाला 145 हा सत्तास्थापनेच्या आकडा गाठता आलेलं नाही. शिवसेना 56 जागांसह दुसऱ्या, राष्ट्रवादी 54 जागांसह तिसऱ्या, काँग्रेस 44 जागांसह चौथ्या स्थानावर आहे.

अपक्ष उमेदवारांना आपल्याकडे खेचून संख्याबळ वाढवण्याचा शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांचा प्रयत्न आहे.

संबंधित बातम्या 

शिवसेना मुख्यमंत्रिपदाबाबत अडून बसली तर भाजप विरोधात बसायला तयार?

उपमुख्यमंत्रिपदासह 16 मंत्रिपदे, भाजपची शिवसेनेला ऑफर, मुख्यमंत्रिपद नाहीच! 

शिवसेना की भाजप, कोण खोटं बोलतंय? लोकसभेपूर्वी कोणता फॉर्म्युला ठरला?

मुख्यमंत्री म्हणाले 50-50 ठरलंच नाही, संजय राऊत यांनी ‘तो’ व्हिडीओच लावला

मीच मुख्यमंत्री, आदित्यला काय ते शिवसेना ठरवेल, मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची 10 विधाने

अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरलाच नव्हता : मुख्यमंत्री

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.