Chandrashekhar Bawankule | लोकसभा निवडणुकांसाठी भाजपचे मिशन! महाराष्ट्रात 9 केंद्रीय मंत्र्यांचा दौरा, काय आहे प्लॅन?

एकीकडे राज्यात सत्तापरिवर्तनामध्ये भाजप हा केंद्रबिंदू राहिलेला आहे. असे असतानाही दुसरीकडे पक्ष संघटनेवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. त्याअनुशंगाने भाजपाचा मेगा प्लॅन सुरु असून पक्ष वाढीसाठी आणि लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राज्यातील 16 लोकसभा मतदार संघात 9 केंद्रीय मंत्री दाखल होणार आहेत.या दरम्यानच्या काळात धोरणात्मक बदल, स्थानिक पातळीवरील अडचणी, संघाटनात्मक कार्यक्रम, धार्मिक स्थळांना भेटी, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी असे कार्यक्रम नियोजित आहेत.

Chandrashekhar Bawankule | लोकसभा निवडणुकांसाठी भाजपचे मिशन! महाराष्ट्रात 9 केंद्रीय मंत्र्यांचा दौरा, काय आहे प्लॅन?
भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे
Follow us
| Updated on: Aug 06, 2022 | 3:32 PM

ठाणे : राज्यात राजकीय भूकंप झाल्यानंतर आता कुठे शिंदे सरकार स्थापन होऊन मंत्रिमंडळाची लगबग सुरु आहे. एकीकडे मंत्रिमंडळ विस्तारात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री व्यस्त असतानादेखील (BJP Party) भाजपाने पक्ष संघटनेवर विशेष भर दिला आहे. आगामी काळात होणाऱ्या (Lok Sabha elections) लोकसभा निवडणुकांच्या अनुशंगाने आतापासूनच तयारी केली जाऊ लागली आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये अधिकतर जागांवर कमळ फुलेल कसे याबाबक रणनिती आखली जात असून महाराष्ट्रात 09 (Central Minister) केंद्रीय मंत्र्यांचा दौरा नियोजित आहे. यामध्ये कार्यकर्त्यांशी संवाद आणि पक्ष संघटन यावर भर दिला जाणार आहे. त्याअनुशंगाने नेमकी रणनिती काय याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.

16 लोकसभा मतदार संघात 9 केंद्रीय मंत्री

एकीकडे राज्यात सत्तापरिवर्तनामध्ये भाजप हा केंद्रबिंदू राहिलेला आहे. असे असतानाही दुसरीकडे पक्ष संघटनेवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. त्याअनुशंगाने भाजपाचा मेगा प्लॅन सुरु असून पक्ष वाढीसाठी आणि लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राज्यातील 16 लोकसभा मतदार संघात 9 केंद्रीय मंत्री दाखल होणार आहेत.या दरम्यानच्या काळात धोरणात्मक बदल, स्थानिक पातळीवरील अडचणी, संघाटनात्मक कार्यक्रम, धार्मिक स्थळांना भेटी, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी असे कार्यक्रम नियोजित आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे 21 कार्यक्रम हे मंत्री मतदार संघात घेणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले आहे.

कोणत्या मतदार संघात कोणते मंत्री?

राज्यातील 16 लोकसभा मतदार संघात 09 केंद्रीय मंत्र्यांचा दौरा असणार आहे. यामध्ये कल्याण लोकसभेला आणि मध्य दक्षिण मुंबई लोकसभेला अनुराग ठाकूर, दक्षिण मुंबईला नारायण राणे, पालघरला विश्वेश्वर तुडु, शिर्डी मध्ये प्रल्हाद पटेल येणार आहेत तर बारामतीला केंद्रीय मंत्री निर्मल सीतारामन यांचा दौरा असणार आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा तीन दिवसीय कल्याण मध्ये दौरा होणार आहे. आगामी काळात हे दौरे होणार असून पक्ष वाढीबरोबर कार्यकर्त्यांच्या अडीअडचणीही जाणून घेतल्या जाणार आहेत.

तीन दिवस विधानसभा मतदारसंघ

केंद्रीय मंत्र्यांकडून केवळ लोकसभा मतदारसंघ असेच नाहीतर विधानसबा मतदार संघातही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. एक मंत्री तीन दिवस मतदार संघात राहून विविध कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. यामध्ये संघटनात्मक कार्यक्रम, धार्मिक स्थळांना भेटी, सहकार्य असणाऱ्या कार्यकर्त्यांची बैठकी तसेच व्यापारी, वकील, डॉक्टर यांच्यासोबतही कार्यक्रम राहणार आहेत. अशा प्रकारे 21 कार्यक्रमाचे नियोजन आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम आणि थेट संवाद असा दुहेरी उद्देश साधला जाणार आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.