‘माणुसकीला काळिमा फासणारी घटना, समाज हादरुन गेलाय’, चंद्रकांत पाटलांची कठोर शिक्षेची मागणी

या घटनेमुळे समाज हादरुन गेलाय. ज्या प्रकारे ही घटना घडली आहे, यात अनेकजण आहेत. कडक शिक्षा झाली पाहिजे. त्या शिवाय अशा प्रवृत्तींना धाक निर्माण होणार नाही. गेल्या चार दिवसातील ही सहावी घटना आहे. महिलांवर अत्याचार होत असताना कारवाई होत नसल्यामुळे अशा घटनांमधील सराईतपणा वाढल्याची खंत पाटील यांनी व्यक्त केलीय.

'माणुसकीला काळिमा फासणारी घटना, समाज हादरुन गेलाय', चंद्रकांत पाटलांची कठोर शिक्षेची मागणी
चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष
Follow us
| Updated on: Sep 11, 2021 | 2:56 PM

कोल्हापूर : साकीनाका बलात्कार प्रकरणावर आता राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केलीय. माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. या घटनेमुळे समाज हादरुन गेलाय. ज्या प्रकारे ही घटना घडली आहे, यात अनेकजण आहेत. कडक शिक्षा झाली पाहिजे. त्या शिवाय अशा प्रवृत्तींना धाक निर्माण होणार नाही. गेल्या चार दिवसातील ही सहावी घटना आहे. महिलांवर अत्याचार होत असताना कारवाई होत नसल्यामुळे अशा घटनांमधील सराईतपणा वाढल्याची खंत पाटील यांनी व्यक्त केलीय. ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते. (Chandrakant Patil criticizes Mahavikas Aghadi government over Sakinaka rape case)

एका बाजूला कोविडचे निर्बंध आहेत, तर दुसरीकडे अशा घटना घडत आहेत. पोलीस काय करत आहेत? असा संतप्त सवालही चंद्रकांत पाटील यांनी विचारलाय. महाविकास आघाडीमधील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांचा अशा घटनांमध्ये सहभाग दिसतोय. तर इथे सरकार असल्यामुळे पोलिसांवर दबाव आणला जातोय. कमी कलमं लावली जात आहेत. राज्यात कायद्याचा धाक राहिला नाही. पटापट जामीन होत आहे, असा आरोप करतानाच देवेंद्र फडणवीस यांच्या काळात कायद्याचा धाक निर्माण झाला होता. पण आता पोलिसांवर राजकीय दबाव असेल तर काय होणार, अशी खोचक टिप्पणीही पाटील यांनी केली आहे.

आघाडी सरकावर टीका, काँग्रेसला जोरदार टोला

कोविडच्या काळात आचारसंहितेच्या नावाखाली अतिरेक चालला आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याला सूट दिली जातेय. तर इतरांना परवानगी काढायला लावली जातेय. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना हैराण करणं सुरु आहे, असा आरोपही पाटील यांनी केलाय. तसंच पवार काहीही म्हणाले तरी काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार नाही. काँग्रेस आता पक्ष राहिला नाही. वैयक्तिक निर्णय घेतले जात आहेत. यातील बहुतेकजण सत्ता मिळते ना मग सहन करा असंच म्हणतील, असा खोचक टोलाही पाटील यांनी काँग्रेसला लगावलाय.

बलात्कार पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल, असं आश्वासन देताना, फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, मुंबतील कोर्टाने आरोपी मोहन चौहानला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पीडित महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला. या प्रकाराने मुंबई पुन्हा एकदा हादरुन गेली. या महिलेची प्रकृती गंभीर होती. तिच्यावर मुंबईतील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच तिचा मृत्यू झाला.

खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार

याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, “साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भात मी राज्याच्या गृहमंत्र्यांशी देखील बोललो आहे. खटला फास्ट ट्रॅक चालवला जाईल. मुख्यमंत्र्यांनी या घटनेविषयी संपूर्ण माहिती घेतली असून पोलीस आयुक्तांशी देखील ते बोलले आहेत. झालेली घटना निंदनीय आहे. हे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारास कठोरात कठोर शासन केले जाईल. यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी तातडीने तपासाला गती देण्याचे निर्देश दिल्याचेही सांगितले.ॉ

इतर बातम्या : 

आतडे कापले, प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकला, साकीनाका पीडितेच्या मृत्यूनंतर चित्रा वाघ हमसून हमसून रडल्या

साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेचा मृत्यू; राऊत म्हणतात, हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न

Chandrakant Patil criticizes Mahavikas Aghadi government over Sakinaka rape case

Non Stop LIVE Update
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.