आधी राम शिंदे, मग जयकुमार गोरे, आता मुख्यमंत्र्यांनी तिसरा मंत्री ठरवला

मुख्यमंत्र्यांनी (CM Devendra Fadnavis ministry) कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे यांना तर माण-खटावमध्ये जयकुमार गोरे यांना मंत्री बनवणार असल्याचं म्हटलं होतं.

आधी राम शिंदे, मग जयकुमार गोरे, आता मुख्यमंत्र्यांनी तिसरा मंत्री ठरवला

यवतमाळ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या आगामी मंत्रिमंडळताली तिसरा मंत्री (CM Devendra Fadnavis ministry ) ठरवला आहे. यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी (CM Devendra Fadnavis ministry) कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे यांना तर माण-खटावमध्ये जयकुमार गोरे यांना मंत्री बनवणार असल्याचं म्हटलं होतं. आज यवतमाळच्या सभेत मुख्यमंत्र्यांनी निलय नाईक (Nilay Naik vs Indranil Naik) यांना मंत्री करण्याची ग्वाही दिली. महत्त्वाचं म्हणजे निलय नाईक (Nilay Naik vs Indranil Naik) यांची लढत त्यांचे चुलत बंधू आणि राष्ट्रवादीचे उमेदवार इंद्रनील नाईक (Indranil Naik) यांच्याशी होत आहे. हे दोघेही माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या घराण्यातील आहेत.

मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातील दुसरा मंत्री ठरवला!

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज भाजपची प्रचारसभा यवतमाळमध्ये झाली. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, “जर तुम्ही निलयभाऊंना विधानसभेत पाठवलं तर माझा शब्द आहे की मी निलय भाऊला मंत्री बनविणार.विधानपरिषदेच्या सदस्याला मंत्री करण्याबाबत मोदीजींनी नियम बनविले आहे, त्यामुळे निलयभाऊंना विधानसभेत पाठवा. जाताना निलय भाऊ आमदार जातील येताना मंत्री म्हणून येतील”

निलय नाईक यांनी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना विधानपरिषदेवर पाठवलं. निलय नाईक हे विधानपरिषदेचे विद्यमान आमदार आहेत. मात्र तरीही ते आता विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत.

निलय नाईक यांनी 2009 मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता.

निलय नाईक विरुद्ध इंद्रनील नाईक

यवतमाळमधील पुसद मतदारसंघात इंद्रनील नाईक (राष्ट्रवादी) विरुद्ध निलय नाईक (भाजप)  यांच्यात लढत होत आहे. हे दोघे चुलत भाऊ आहेत.

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि बाबासाहेब नाईक हे सख्खे भाऊ.  बाबासाहेब नाईक यांना मनोहर, मधुकर आणि सुधाकर नाईक अशी तीन मुलं. मनोहर यांना इंद्रनील आणि ययाती ही दोन अपत्य. तर मधुकर नाईक यांना निलय आणि अनिल अशी दोन मुले. सुधाकर यांचा जय नाईक हा मुलगा आहे.

संबंधित बातम्या 

माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा पुतण्या शिवसेनेच्या वाटेवर    

नातेवाईक vs नातेवाईक | कुठे सख्खे भाऊ, कुठे काका-पुतणे रिंगणात   

नवे आहेत पण छावे आहेत, राजकीय घराण्यांची युवा पिढी मैदानात    

माण विधानसभा : एक भाऊ भाजपात, दुसरा शिवसेनेत; जयकुमार गोरेंसमोर तगडं आव्हान 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *