CM Eknath Shinde: सरकार बदललं, यादी बदलणार, राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी 12 जणांची नावं नव्यानं पाठवणार, भाजपचे किती, शिंदे गटाचे किती?

नव्या सरकारकडून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नावं नव्यानं पाठवली जाणार असल्याची माहिती मिळतेय. आता यात भाजपचे की आणि शिंदे गटाचे किती आणि कुणाची नावं असणार? ती यादी राज्यपाल मंजूर करणार का? आणि किती दिवसांत मंजूर करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

CM Eknath Shinde: सरकार बदललं, यादी बदलणार, राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी 12 जणांची नावं नव्यानं पाठवणार, भाजपचे किती, शिंदे गटाचे किती?
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे
Image Credit source: ANI
सागर जोशी

|

Jul 01, 2022 | 7:34 PM

मुंबई : महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्यात मागील अडीच वर्षात सततचा वाद आपण पाहिला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही राज्यपाल कोश्यारी यांच्यावर सातत्याने टीका केली. त्यातील कळीचा मुद्दा होता तो राज्यपाल नियुक्ती 12 आमदारांचा. महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी 12 जणांची यादी दिली होती. मात्र, राज्यपाल कोश्यारी यांनी ती शेवटपर्यंत मंजूर केली नाही. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतानाही उद्धव ठाकरे यांनी या 12 आमदारांच्या मुद्द्यावरुन राज्यपालांना टोला लगावला होता. मात्र, आता नव्या सरकारकडून राज्यपाल (Governor) नियुक्त 12 आमदारांची नावं नव्यानं पाठवली जाणार असल्याची माहिती मिळतेय. आता यात भाजपचे की आणि शिंदे गटाचे किती आणि कुणाची नावं असणार? ती यादी राज्यपाल मंजूर करणार का? आणि किती दिवसांत मंजूर करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये मविआकडून कुणाची नावं?

महाविकास आघाडीतून राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्येकी चार नावं देण्यात आली होती. त्यात खालील नावांचा समावेश होता.

शिवसेना

उर्मिला मातोंडकर – कला
नितीन बानगुडे पाटील – शिवव्याख्याते
विजय करंजकर – शिवसेना नाशिक जिल्हाध्यक्ष
चंद्रकांत रघुवंशी – नंदुरबाद, पूर्वाश्रमीचे काँग्रेस आमदार

राष्ट्रवादी काँग्रेस

एकनाथ खडसे – समाजसेवा आणि सहकार
राजू शेट्टी – समाजसेवा आणि सहकार
यशपाल भिंगे – साहित्य
आनंद शिंदे – कला

काँग्रेस

रजनी पाटील – समाजसेवा आणि सहकार
सचिन सावंत – समाजसेवा आणि सहकारी
मुझफ्फर पटेल – समाजसेवा
अनिरुद्ध वनकर – कला

राज्यपाल नियुक्त आमदार कसे निवडले जातात?

विधान परिषदेच्या रिक्त जागांवर नियुक्ती करण्याचा अधिकार घटनेनं राज्यपालांना दिलाय. मात्र, ही नियुक्ती करण्यासाठी त्यांना मुख्यमंत्र्यांचा सल्ला घ्यावा लागतो. कलम 163 (1) अंतर्गत विधान परिषदेच्या जागांसाठी राज्यपाल नियुक्ती करु शकतात. तर कलम 171 (5) नुसार राज्यपालांना साहित्य, कला, विज्ञान, सामाजिक, सहकार या पाच क्षेत्रातील व्यक्तींची नियुक्ती करता येते. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राज्यपाल आमदारांची नियुक्ती करु शकतात. मात्र, अंतिम निर्णय हा राज्यपालांचा असतो.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें