AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पूजा चव्हाण प्रकरणात भाजप बड्या नेत्यांविरोधात अजून एक तक्रार

पूजा चव्हाण प्रकरणात बंजारा समाजाची बदनामी होत असल्याची तक्रार पुण्याच्या वानवडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अॅड. रमेश खेमू राठोड यांनी पोस्टाद्वारे एक अर्ज करुन ही तक्रार केली आहे.

पूजा चव्हाण प्रकरणात भाजप बड्या नेत्यांविरोधात अजून एक तक्रार
| Updated on: Mar 02, 2021 | 7:36 PM
Share

पुणे : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागल्यानंतर आता भाजप नेत्यांविरोधात पोलिसांत तक्रारी दाखल होत आहेत. पूजा चव्हाण प्रकरणात बंजारा समाजाची बदनामी होत असल्याची तक्रार पुण्याच्या वानवडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अॅड. रमेश खेमू राठोड यांनी पोस्टाद्वारे एक अर्ज करुन ही तक्रार केली आहे. पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मागणीही या अर्जात करण्यात आली आहे.(Complaint against BJP leaders in Pooja Chavan case in Pune)

अॅड. रमेश राठोड यांनी केलेल्या तक्रारीत भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषेदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, नगरसेवक धनराज घोगरे, युवा मोर्चा पुणे शहर यांच्यासह अनेकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. फ्लॅट बंद असताना मोबाईल आणि लॅपटॉपमधून ऑडिओ क्लिप आणि इतर माहिती बाहेर कशी गेली? असा प्रश्नही या तक्रारीत विचारण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, राज्य महिला आयोग, पोलीस महासंचालक, पुणे पोलीस आयुक्त यांनाही याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

वाशिम जिल्ह्यात अदखलपात्र गुन्हा

पूजा चव्हाण प्रकरणात बंजारा समाजाची बदनामी केल्याचा आरोप करत वाशिम जिल्ह्यातील मनोरा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बंजारा परिषदेचे युवा जिल्हाध्यक्ष श्याम राठोड यांनी ही तक्रार केली आहे. या तक्रारीत भाजपच्या राज्यातील बड्या नेत्यांची नावं घेण्यात आली आहे.

कोणकोणत्या भाजप नेत्यांवर अदखलपात्र गुन्हा?

मनोरा पोलीस ठाण्यात करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप आमदार अतुल भातखळकर, भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ, आमदार आशिष शेलार, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार प्रसाद लाड यांची नावं घेण्यात आली आहे. भाजप नेत्यांनी पीडित पूजा चव्हाणचे चारित्र्य हनन केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.

पूजाच्या वडिलांची चुलत आजीविरोधात पोलिसात तक्रार

पूजाचे वडील लहूदास चव्हाण यांनी पूजाची चुलत आजी शांताबाई राठोड यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. परळी शहर पोलिसात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. शांताबाई यांनी लहू चव्हाण यांच्यावर पाच कोटी रुपये घेऊन तोंड बंद केल्याचा आरोप केला होता. या आरोपावरुन संतापलेल्या लहू चव्हाण यांनी बदनामीची तक्रार पोलिसात केली आहे.

शांताबाई राठोड यांचा नेमका आरोप काय?

“शिवसेना आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी पूजा चव्हाण हिच्या आई-वडिलांना पाच कोटी रुपये देऊन त्यांचं तोंड गप्प केलं आहे. त्यामुळे पूजाचे आई-वडील कधीच तोंड उघडणार नाहीत”, असा सनसनाटी आरोप पूजाची चुलत आजी शांता राठोड (Shanta Rathod) यांनी केला. पूजाचे आई-वडील कधीच तोंड उघडणार नाहीत. संजय राठोड यांच्याकडून मिळालेले पैसे त्यांनी घरातील जमिनीत पुरुन ठेवले आहेत. यांच्या घरात जावयांमध्ये वाद सुरु आहेत. सध्या पूजाचे आई-वडील नव्हे तर त्यांना दिलेला पैसा बोलत आहे. या सगळ्याच्या माध्यमातून पूजाचे मृत्यूप्रकरण दडपण्याचा प्रकार होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूजाला न्याय मिळवून द्यावा, ही माझी नम्र विनंती असल्याचे शांता राठोड यांनी सांगितले.

संबंधित बातम्या : 

…तर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, पंकजा मुंडेंचा अप्रत्यक्षरीत्या निशाणा

फडणवीस, मुनगंटीवार, चित्रा वाघ, भातखळकरांविरोधात वाशिम जिल्ह्यात अदखलपात्र गुन्हा

Pooja Chavan case | पूजा चव्हाण प्रकरणात नवा ट्विस्ट, वडिलांची चुलत आजीविरोधात पोलिसात तक्रार

Complaint against BJP leaders in Pooja Chavan case in Pune

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.