AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव आणि राज ठाकरेंमुळे महाविकास आघाडीत फूट पडली, महायुतीच्या बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ

Raj and Uddhav Thackeray: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत एकत्र येणार असल्याचे जवळपास निश्चित झालेले आहे, मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र या दोघांमुळे महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण झाली असल्याचे एक नेत्याने म्हटलं आहे.

उद्धव आणि राज ठाकरेंमुळे महाविकास आघाडीत फूट पडली, महायुतीच्या बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
uddhav-and-raj-thackeray and ramdas athawale
| Updated on: Nov 03, 2025 | 7:50 PM
Share

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत एकत्र येणार असल्याचे जवळपास निश्चित झालेले आहे, मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. याआधी अनेकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अनेक कार्यक्रम आणि मोर्चानिमित्त एकाच मंचावर आल्याचे पहायला मिळाले आहे. या युतीमुळे महायुतीची चिंता वाढण्याची शक्यता आहे. मात्र आता या दोन्ही नेत्यांच्या युतीवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मोठे विधान केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

उद्धव आणि राज ठाकरेंमुळे महाविकास आघाडीत फूट पडली – आठवले

रामदास आठवले यांनी या दोन्ही नेत्यांच्या युतीवर भाष्य करताना म्हटले की, ‘उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याने आमची महायुती अधिक मजबूत आहे. हे दोघे एकत्र आल्याने महाविकास आघाडीत फूट पडली आहे. काँग्रेस त्यांच्या सोबत यायला तयार नाही. त्यामुळे सगळी जी परिस्थिती आहे ती आमच्या बाजूने आहे. 40 टक्के मराठी मतदान त्यापैकी 20-22 टक्के मतदान आमच्या बाजूने होईल, 60 टक्के अमराठी मतदान आमच्या सोबत राहील. राज ठाकरे यांच्यात सभेला गर्दी करण्याची कुवत आहे, मात्र मतदान मिळवण्याची कुवत नाही. मुंबईत कौल त्यांच्या बाजूने जाणार नाही. मुंबईत महायुतीचा झेंडा फडकेल.’

मतचोरी होऊ नये – आठवले

मतदार याद्यांमधील घोळाबाबत बोलताना रामदास आठवले म्हणाले की, मत चोरी ही आज होते असे नाही. मतचोरी अनेक वर्षांपासून होते, तरी मतचोरी होऊ नये अशी माझी इच्छा आहे. सत्याचा मोर्चा जरी काढला असला तरी या याद्या अगोदर पासून आहेत, काँग्रेसचे सरकार असल्यापासून मतदार याद्या आहेत. त्यांनी इलेक्शन कमिशन कडे तक्रार करावी, राज ठाकरे, उद्धव ठाकरे , शरद पवार व काँग्रेस पक्ष, शेकाप हे सगळे लक्ष एकत्र आले होते. त्यांनी या तक्रारी निवडणूक आयोगापुढे मांडायला हरकत नाही.’

पुढे बोलताना आठवले म्हणाले की, ‘तुमची सत्ता आल्यानंतर मतांची चोरी झाल्याचा आरोप आम्ही केला नाही. आमची सत्ता आल्यानंतर आपण सांगता मतचोरी झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देश पुढे जात आहे. मुंबई सारख शहर बदलत चाललं आहे, मतचोरी होऊ नये ही आमची भूमिका आहे, सत्याच्या मोर्चात दिलेल्या पुराव्यावर मत चोरी होऊ नये यासाठी इलेक्शन कमिशनने खबरदारी घेऊन कार्यवाही करावी.’

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...