AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसच्या सहकार पॅनेलचा लातूर जिल्हा बँकेत दणदणीत विजय, भाजपनं चिठ्ठीच्या साथीनं खातं उघडलं

लातूर जिल्हा बँकेत काँग्रेसच्या सहकार पॅनेलनं 18 जागांवर विजय मिळवला आहे. तर, भाजपला एका जागेवर विजय मिळाला आहे.

काँग्रेसच्या सहकार पॅनेलचा लातूर जिल्हा बँकेत दणदणीत विजय, भाजपनं चिठ्ठीच्या साथीनं खातं उघडलं
लातूर जिल्हा बँकेच्या निकालानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष
| Edited By: | Updated on: Nov 22, 2021 | 3:29 PM
Share

लातूर : राज्यात सध्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांच्या निकालाचं वारं सुरु आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुकीच्या निमित्तानं विविध जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघताना दिसतंय. लातूर जिल्हा बँकेत काँग्रेसच्या सहकार पॅनेलनं 18 जागांवर विजय मिळवला आहे. तर, भाजपला एका जागेवर विजय मिळाला आहे.लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणूकीत काँग्रेसच्या सहकार पॅनेलला बहुमत मिळाले आहे.19 पैकी काँग्रेसचे 18 उमेदवार निवडून आले आहेत, तर भाजपाप्रणीत लोकशाही पॅनेलचा एक उमेदवार निवडून आला आहे.

चिठ्ठीचा कौल भाजपला

जिल्हा बँकेत भाजपचा एक उमेदवार निवडून आला आहे. विशेष म्हणजे या एक जागेसाठी देवणी गटातून चुरस पहायला मिळाली. दोन्ही बाजूच्या उमेदवाराला समसमान मते मिळाल्याने चिठ्ठी काढावी लागली त्यात भाजपाचे भगवानराव पाटील तळेगावकर यांना विजयी ठरवण्यात आले.

धीरज देशमुख यांच्यावर प्रचाराची जबाबदारी

या निवडणुकीत काँग्रेसच्या बाजूने आमदार धीरज देशमुख यांनी प्रचाराची जवाबदारी सांभाळली ते स्वतःही उमेदवार होते. भाजपाकडून आमदार संभाजी पाटील निलंगेकर आणि आमदार रमेश कराड यांनी प्रचाराची जबाबदारी सांभाळली. 19 पैकी 10 उमेदवार अगोदरच बिनविरोध निवडून आले होते. आज 9 जागांची मतमोजणी पार पडली. आज झालेल्या मतमोजणीत काँग्रेसप्रणीत सहकार पॅनेलनं 8 जागा तर भाजपाच्या लोकशाही बचाव पॅनेलचा 1 उमेदवार निवडून आला आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत यंदा माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी आपली उमेदवारी दाखल केलेली नव्हती. भाजपच्या पॅनेलचे अर्ज बाद झाल्यानं त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे दाद मागणार असल्याचंही म्हटलं होतं.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस प्रणीत सहकार पॅनेलचे 18 उमेदवार विजयी झाले आहेत. तर, भाजपला केवळ एका जागेवर समाधान मानावं  लागलं. काँग्रेस प्रणीत सहकार पॅनेलच्या विजयानंतर  उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष केला आहे. धीरज देशमुख यांनी मतदारांनी आम्हाला कौल दिलेला आहे. जिल्हा बँकेनं गेल्या तीन दशकांपासून चांगल्या प्रकारे काम केलं आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कामाचा विस्तार करणार असल्याचं धीरज देशमुख म्हणाले. लातूर जिल्हा बँकेचा लौकिक राज्यात आणि देशात आहे. जिल्हा बँकेची यशस्वी परंपरा पुढील काळात जपणार असल्याचं धीरज देशमुख म्हणाले.

इतर बातम्या:

देशाच्या संरक्षणात योगदान देणाऱ्या जवानांचा शौर्य पुरस्काराने सन्मान, जाणून घ्या विविध श्रेणींमध्ये का दिले जातात शौर्य सन्मान

Solapur: एसटीच्या विलिनीकरणासाठी मोहोळच्या शेतकऱ्याचं तुळजाभवानीला साकडं, 45 किमीपर्यंत लोटांगण घालत आंदोलन

जळगाव जिल्हा बँकेत भाजपला धक्का, महाविकास आघाडीचा 20 जागांवर विजय, रोहिणी खडसेंचा एकतर्फी विजय

Congress Panel won 18 seats in Latur District co operative bank ltd election BJP won only one seat

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.