LIVE : राहुल गांधींचा राजीनामा फेटाळला

नवी दिल्ली : राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनाम दिला. काँग्रेस कार्यकारिणीकडे हा राजीनामा सोपवल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र काँग्रेस कमिटीने तो फेटाळला.  देशभरात लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरु झालं आहे. मात्र राहुल गांधींचा राजीनामा काँग्रेस कार्यकारिणीने फेटाळला. राहुल गांधी यांना राजीनामा देण्याची गरज नाही, असं माजी पंतप्रधान मनमोहन सिंह म्हणाले. याशिवाय यूपीए …

LIVE : राहुल गांधींचा राजीनामा फेटाळला

नवी दिल्ली : राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनाम दिला. काँग्रेस कार्यकारिणीकडे हा राजीनामा सोपवल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र काँग्रेस कमिटीने तो फेटाळला.  देशभरात लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरु झालं आहे. मात्र राहुल गांधींचा राजीनामा काँग्रेस कार्यकारिणीने फेटाळला. राहुल गांधी यांना राजीनामा देण्याची गरज नाही, असं माजी पंतप्रधान मनमोहन सिंह म्हणाले. याशिवाय यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी यांनीही राहुल गांधींची मनधरणी केली.

काँग्रेस वर्किंग कमिटी अर्थात काँग्रेस कार्यकारिणीची आज बैठक झाली. या बैठकीला UPA च्या अध्यक्षा सोनिया गांधी, प्रियांका गांधी, नाना पटोले, मोतीलाल वोरा, के सी वेणुगोपाल, रजनी पाटील, गिरीजा व्यास, मुकुल वासनिक, पी सी चाको, अशोक गहलोत, अविनाश पांडे, गुलाम नबी आजाद, मल्लिकार्जुन खर्गे, कॅप्टन अमरिंदर सिंह हे उपस्थित होते.

आम्ही सर्वजण राजीनामा देण्यास तयार – अशोक चव्हाण

राहुल गांधी यांनी राजीनामा देण्याची गरज नाही. हे अपयश त्यांचं एकट्याचे नाही. आम्ही सामूहिक राजीनाम्याच्या तयारीत आहोत. पराभवासाठी राहुल गांधी एकटे जबाबदार नाहीत, राहुल गांधींनी राजीनामा देऊ नये, त्यांनी त्या त्या राज्यातील प्रमुखांचा राजीनामा घ्यावा आणि नवी जबाबदारी सोपवावी, असं अशोक चव्हाण म्हणाले.

CWC Meeting LIVE UPDATE

Picture

राहुल गांधींच्या राजीनाम्याची मुख्यमंत्र्यांकडून खिल्ली

25/05/2019,2:04PM
Picture

राहुल गांधींनी राजीनामा देण्याची गरज नाही - अशोक चव्हाण

आम्ही सामूहिक राजीनाम्याच्या तयारीत, पराभवासाठी राहुल गांधी एकटे जबाबदार नाहीत, राहुल गांधींनी राजीनामा देऊ नये, त्यांनी त्या त्या राज्यातील प्रमुखांचा राजीनामा घ्यावा आणि नवी जबाबदारी सोपवावी – अशोक चव्हाण

25/05/2019,1:08PM
Picture

राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम

राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये हाहाकार, राजीनामा परत घेण्याची कार्यकर्त्यांची मागणी, राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम, तर सोनिया गांधी, मनमोहन सिंहांकडून राहुल गांधींना मनधरणीचे प्रयत्न

25/05/2019,12:36PM


अशोक चव्हाणांचाही राजीनामा?

लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला पुन्हा एकदा मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ बघायला मिळत आहे. स्वत: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा सोपवला. याशिवाय महाराष्ट्रातील मोठ्या पराभवामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे सुद्धा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.

देशासह उत्तर प्रदेशातही काँग्रेसचा दारुण पराभव झाला. तर अमेठी जो काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो तिथेही काँग्रेस हरली. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी घेत प्रदेश अध्यक्ष राज बब्बर यांनी त्यांचा राजीनामा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पाठवला आहे. दुसरीकडे अमेठीतून स्वत: राहुल गांधी निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र इथेही काँग्रेस हरली. त्यामुळे अमेठीच्या काँग्रेस जिल्हा अध्यक्ष योगेश मिश्रा यांनी या पराभवाची जबाबदारी घेत त्यांनीही राजीनामा राहुल गांधींना पाठवला आहे. तर लोकसभा आणि विधानसभेत पक्षाच्या खराब प्रदर्शानामुळे ओदिशाच्या प्रदेश अध्यक्ष निरंजन पटनायक यांनीही राजीनामा दिला आहे.

काँग्रेसचा दारुण पराभव

निवडणूक आयोगाने 2019 ची मतमोजणी संपल्यानंतर अंतिम निकालाची घोषणा केली. भाजपप्रणित एनडीएने 352 जागा मिळवत पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे. तर काँग्रेसला केवळ 52 जागांवर विजय मिळाला. 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसला 44 जागा मिळाल्या होत्या. यामध्ये त्यात वाढ झाली असली, तरी स्वत: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचाच अमेठीत पराभव झाला. राहुल गांधी दोन जागेवर उभे होते, त्यापैकी केरळमधील वायनाड इथे त्यांचा मोठा विजय झाला.

संबंधित बातम्या 

पराभव राहुल गांधींचा, राजीनामा यूपीचे प्रदेश अध्यक्ष आणि अमेठीच्या जिल्हाध्यक्षाचा

नांदेडकरांना गृहीत धरणं महागात, अशोक चव्हाणांच्या पराभवाचं सखोल विश्लेषण

शिवसेनेकडून 5 मंत्रिपदं, लोकसभा उपाध्यक्षपदाची मागणी?  

माजी पंतप्रधान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ते माजी मुख्यमंत्री, दिग्गजांचा पराभव

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *