शिवसेनेसोबत जाण्यास सोनिया गांधीचा होकार?

काँग्रेसच्या हायकमांडच्या दिल्लीतील बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शिवसेनेसोबत जाण्यास संमती दर्शवली आहे. सूत्रांनी याबाबतची माहिती दिली (Sonia Gandhi agree with shivsena alliance) आहे.

शिवसेनेसोबत जाण्यास सोनिया गांधीचा होकार?
Follow us
| Updated on: Nov 20, 2019 | 5:25 PM

नवी दिल्ली : राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा लवकरच सुटण्याची चिन्हं दिसू लागली (Sonia Gandhi agree with shivsena alliance) आहेत. कारण काँग्रेस हायकमांडच्या दिल्लीतील बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शिवसेनेसोबत जाण्यास संमती दर्शवली आहे. सूत्रांनी याबाबतची माहिती दिली (Sonia Gandhi agree with shivsena alliance) आहे. त्यामुळे आता लवकरच राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार स्थापन होणार असल्याची चर्चा (Sonia Gandhi agree with shivsena alliance) आहे.

काँग्रेसची आज दिल्लीत बैठक झाली. या बैठकीला काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित आहेत. या बैठकीतच सोनिया गांधी यांनी याबाबतचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली (Sonia Gandhi agree with shivsena alliance) आहे. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची संयुक्त बैठक होणार आहे.

“शिवसेनेसोबत सत्तास्थापनेची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. आज किमान समान कार्यक्रम निश्चित होईल. सरकार स्थापनेबाबतची चर्चा 2-3 दिवसात संपेल”, अशी एक्स्क्लुझिव्ह माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली होती.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सरकार – संजय राऊत

अनेक दिवसांपासून खोळंबलेला सत्तास्थापनेचा प्रश्न डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुटेल आणि शिवसेनेच्या नेतृत्वात एक मजबूत लोकप्रिय सरकार स्थापन होईल, असा दावा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. तसंच उद्यापर्यंत (21 नोव्हेंबर) सत्तेचं चित्र स्पष्ट होईल, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, याचाही पुनरुच्चार केला.

सत्तास्थापनेच्या प्रक्रियेत निर्णय जलदगतीने घ्या, अशी आग्रही मागणी शिवसेनेने काल (19 नोव्हेंबर) काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे केली होती. यापूर्वी शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, सुनील तटकरे यांच्यात बैठक झाल्याची माहितीही सूत्रांनी दिली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. या बैठकीत शिवसेनेबरोबर सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने महत्वाचे निर्णय मार्गी लागण्याची शक्यता आहे.

महासेनाआघाडीच्या किमान समान कार्यक्रमातले महत्त्वाचे मुद्दे (MahaSenaAghadi Common Minimum Program)

1. शेतकऱ्यांची कर्जमाफी, सातबारा कोरा करणार ही शिवसेनेची भूमिका

2. पायाभूत सुविधांच्या प्रकल्पात वेगानं काम करण्याचा विचार

3. राज्य सरकारची वित्तीय तूट कमी करण्यासाठी आर्थिक नियोजन

4. सावकारी कर्जातून शेतकऱ्यांची मुक्तता

5. विजेच्या दरात कपात

6. रोजगाराची संख्या वाढवणे, जास्तीत जास्त रोजगार द्यायचा प्रयत्न

संबंधित बातम्या : 

शरद पवार EXCLUSIVE : शिवसेनेसोबत सत्तास्थापनेची चर्चा अंतिम टप्प्यात

सत्तास्थापनेचा निर्णय जलदगतीने घ्या, शिवसेनेची काँग्रेसकडे आग्रही मागणी

सत्तास्थापनेची दिल्लीत खलबतं, संजय राऊत पुन्हा शरद पवारांच्या भेटीला

येत्या दोन दिवसात सत्तास्थापनेचा तिढा सुटणार?

Non Stop LIVE Update
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.