येत्या दोन दिवसात सत्तास्थापनेचा तिढा सुटणार?

येत्या दोन ते तीन दिवसात राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली (Maharashtra government crisis will finish soon) आहे.

येत्या दोन दिवसात सत्तास्थापनेचा तिढा सुटणार?

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून 3 आठवडे उलटूनही राज्यात सत्तास्थापनेचा पेच अद्याप (Maharashtra government crisis will finish soon) कायम आहे. मात्र येत्या दोन ते तीन दिवसात राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर उद्या (20 नोव्हेंबर) दिल्लीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची महत्वाची बैठक होणार (Maharashtra government crisis will finish soon) आहे. मात्र या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार उपस्थित राहणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान राज्यातील इतर महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार (Maharashtra government crisis will finish soon) आहेत.

उद्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीला शरद पवार उपस्थित राहणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान या बैठकीला पक्षाचे अन्य नेते आणि काँग्रेस नेते किमान समान कार्यक्रमावर चर्चा करणार आहे. त्यामुळे किमान समान कार्यक्रम उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे. शिवसेना नेत्यांशी आज याबाबत अनौपचारिक चर्चा झाल्याचीही शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

दरम्यान शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची यानंतर एकही भेट होणार नसल्याची शक्यताही सूत्रांनी वर्तवली आहे. दिल्लीत राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते दाखल झाले आहेत. शिवाय काँग्रेसचे नेतेही दिल्लीच्या मार्गावर आहेत. शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, सुनील तटकरे यांच्यात आज बैठक झाल्याची माहितीही सूत्रांनी दिली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा (Maharashtra government crisis will finish soon) झाली.

त्यातच नुकतंच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पुन्हा एकदा भेट (Sanjay raut meet Sharad Pawar) घेतली. या भेटीत राज्यातील सत्तास्थापनेबाबत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली (Sanjay raut meet Sharad Pawar) जात आहे.

शरद पवार- सोनिया गांधी यांची बैठक

दरम्यान, शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात काल बैठक झाली. शरद पवार (Sharad Pawar meet Sonia Gandhi) हे सोनिया गांधी यांच्या दिल्लीतील 10 जनपथ या निवासस्थानी दाखल झाले होते. तिथे दोघांमध्ये जवळपास 50 मिनिटे चर्चा झाली. या भेटीनंतर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधून चर्चेचा तपशील सांगितला. शरद पवार म्हणाले, “सोनिया गांधी आणि ए के अँटोनी यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली.  महाराष्ट्रातील राजकीय स्थितीबाबत सविस्तर चर्चा झाली. राज्यातील स्थिती सोनिया गांधी यांना सांगितली. या परिस्थितीवर लक्ष ठेवू, वरिष्ठ नेत्यांचं मत घेऊन पुढील रुपरेषा ठरवू. एवढीच चर्चा झाली”

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *