‘संघाला कोरोनापेक्षा मोदींच्या ढासळत्या लोकप्रियतेची चिंता अधिक’, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर काँग्रेसचा हल्लाबोल

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चिंतन शिबिरावर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी जोरदार टीका करण्यात आलीय.

'संघाला कोरोनापेक्षा मोदींच्या ढासळत्या लोकप्रियतेची चिंता अधिक', राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर काँग्रेसचा हल्लाबोल
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत,पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Jun 05, 2021 | 6:18 PM

मुंबई : कोरोनाची दुसरी लाटेत देशाच्या आरोग्य व्यवस्थेती मर्यादा स्पष्ट झाली आहे. त्याचबरोबर पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव, या पार्श्वभूमीवर मोदींची लोकप्रियता ढासळत असल्याचं बोललं जात आहे. अशावेळी पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपच्या, पर्यायानं मोदींच्या मदतीला धावून आला आहे. नरेंद्र मोदी यांची घटती लोकप्रियता सावरण्यासाठी दिल्लीत संघाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचं चिंतन सुरु आहे. या बैठकीचा आज समारोप झाला. दरम्यान, संघाच्या या चिंतन शिबिरावर काँग्रेसकडून जोरदार टीका करण्यात आलीय. (Sachin Sawant criticizes Rashtriya Swayamsevak Sangh and PM Narendra Modi)

काँग्रेसचे प्रवक्त सचिन सावंत यांनी संघाच्या या चिंतन शिबिरावर ट्विटरच्या माध्यमातून जोरदार हल्ला चढवलाय. मोदींची लोकप्रियता ढासळत असल्याच्या पार्श्वभूमीवर संघाकडून या बैठकीचं आयोजन करण्यात आलं. त्यात सरसंघचालक मोहन भागवत, नवनियुक्त सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे, सर्व पाच सहसरकार्यवाह, भैय्याजी जोशी. तसंच भाजपचे महामंत्री बी. एल. संतोष यांच्यासह संघाचे मोठे पदाधिकारी या बैठकीत सहभागी झाले. संघाच्या या चिंतन शिबिरावरुन सचिन सावंत यांनी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केलीय.

सचिन सावंत यांची टीका

‘संघाच्या मोदींच्या ढासळत्या लोकप्रियतेवरील चिंतन बैठकीतून या गोष्टी स्पष्ट- १. संघ ही सांस्कृतिक संघटना नसून राजकीय संघटना २. संघाचा बोगस राष्ट्रवाद- मोदींना सत्तेसाठी जनता मरते का जगते याची चिंता नाही याचप्रमाणे संघाला कोरोनापेक्षा मोदींच्या ढासळत्या लोकप्रियतेची चिंता आहे’, अशा शब्दात सचिन सावंत यांनी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्ला चढवलाय.

‘भाजपा अत्यंत खोटारडा, विखारी व कांगावाखोर’

यापूर्वी टूलकिट प्रकरणावरुन सचिन सावंत यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. ‘भाजपा अत्यंत खोटारडा, विखारी व कांगावाखोर पक्ष आहे. ‌सदर टूलकिट हे बनावट आहे. काँग्रेसकडून जे. पी. नड्डा आणि संबित पात्रा यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे. त्यात अतुल भातखळकर यांचंही नाव देऊ. मोदींची कोविड हाताळण्यातील अपयशाने डागळलेली प्रतिमा सावरण्यासाठी हा बनाव भाजपाने रचला आहे,’ असा गंभीर आरोप सावंत यांनी केला होता.

संबंधित बातम्या :

भाजपच्या गडात काँग्रेस लागली कामाला, नाना पटोलेंचं ‘मिशन विदर्भ’, भाजपवासी झालेल्या अनेकांची घरवापसी होणार!

शिवसेना-भाजप पुन्हा कधी एकत्र येऊ शकतात? उद्धव ठाकरे म्हणतात..

Sachin Sawant criticizes Rashtriya Swayamsevak Sangh and PM Narendra Modi

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.