Eknath Shinde : ‘शिंदेसाहेबांच्या मनात जराही कुठे असं नाही की उद्धव ठाकरेंना दुखवावं, शिवसेनेतून बाहेर पडावं’

Uddhav Thackeray : "आघाडी करायची की युती करायची, हाच एक प्रश्न आहे. मी आणखी एक खुलं पत्र लिहिणार आहे", अशी माहिती दीपक केसरकरांनी दिली.

Eknath Shinde : 'शिंदेसाहेबांच्या मनात जराही कुठे असं नाही की उद्धव ठाकरेंना दुखवावं, शिवसेनेतून बाहेर पडावं'
Image Credit source: TV9 Marathi
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

Jun 28, 2022 | 8:53 AM

मुंबई : सध्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात सुरू असलेला वाद चांगलाच चिघळलाय. शिवसेनेतील अंतर्गत बंडाने कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे.  हा वाद विकोपाला गेला असतानाच शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी एक महत्वाचं विधान केलंय. ‘शिंदेसाहेबांच्या मनात जराही कुठे असं नाही की उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) दुखवावं, शिवसेनेतून बाहेर पडावं’, असं दीपक केसरकर यांनी म्हटलंय. “राज्यपालांना पत्र देण्याबाबत आम्ही विधिज्ञांना विचारुन मग पुढील प्रक्रिया करणार आहोत. मला वाटतं जे काही अविश्वास वगैरे असतो, त्याला कोणतीही बंदी न्यायालयाने केलेली नाही. पाठींबा काढून घेतल्यानं राज्यपालांना आम्ही कळवलं, तर राज्यपालांना अधिवेशन बोलवावं लागले” असं दीपक केसरकर म्हणाले आहेत. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

“शिंदेसाहेबांच्या मनात…”

“आमच्याशी चर्चा करुन काय होणार आहे? आमचे जे मित्र पक्ष आहेत, त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. आम्ही का दुखावलो गेलो, यावर त्यांनी चर्चा करावी. त्यांनी चर्चा करावी. चर्चा त्यांची जेव्हा होईल, त्यात सकारात्मक काही निघालं की पुढे शिंदेसाहेबांना सांगितलं की ते शिंदेसाहेब स्वतःहून पुढे येतील. शिंदेसाहेबांच्या मनात कुठेही असं नाहीये की उद्धव ठाकरेंना दुखवावं, शिवसेनेतून बाहेर पडावं”, असं दीपक केसरकर  म्हणालेत.

“शिंदे साहेबांशी माझी बोलणं झालेलं नाही. याबाबत जाहीर चर्चा करता येत नाही. निर्णय घेतल्यानंतर अंमलबजावणी केली जाते. व्हिडीओ टाकणं, लोकांना प्रेशरराईज करणं, हे सगळं चाललंय. थोडासा आम्हाला वेळ दिला पाहिजे. आम्ही ठरवू आणि मग अंमलबजावणी करुन. मी जाहीर पत्र कालच लिहिलंय. आता निर्णय त्यांनी घ्यायचाय. उद्धव ठाकरेंनी आमच्या पत्राचा विचार करायचाय. ते मोठे नेते आहेत. त्यांनी योग्य निर्णय घ्यावा”,  असंही केसरकर म्हणाले आहेत.

हे सुद्धा वाचा

“आघाडी करायची की युती करायची, हाच एक प्रश्न आहे. मी आणखी एक खुलं पत्र लिहिणार आहे”, अशी माहितीही केसरकरांनी दिली.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें