CBI raid at Manish Sisodia : दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया दारू घोटाळ्याचे मुख्य आरोपी, एकूण 15 जणांवर एफआयआर दाखल; अटक होणार?

CBI raid at Manish Sisodia : सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयने छापा मारल्याची माहिती मिळाल्यानंतर सिसोदिया यांच्या घराबाहेर आप कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे.

CBI raid at Manish Sisodia : दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया दारू घोटाळ्याचे मुख्य आरोपी, एकूण 15 जणांवर एफआयआर दाखल; अटक होणार?
दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया दारू घोटाळ्याचे मुख्य आरोपी, एकूण 15 जणांवर एफआयआर दाखल; अटक होणार?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 19, 2022 | 6:38 PM

नवी दिल्ली: दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते मनिष सिसोदिया (Manish Sisodia) यांना सीबीआयने (CBI raid) दारू घोटाळ्यातील मुख्य आरोपी बनवलं आहे. त्यांच्यासह एकूण 15 जणांवर सीबीआयने एफआयआर दाखल केला आहे. अबकारी धोरणात अनियमितता (excise policy case) केल्याचा आरोप सिसोदिया यांच्यावर ठेवण्यात आला आहे. सीबीआईने पीसी अॅक्ट 1988, 120बी, 477ए वास्तविक गुन्ह्याच्या आधारे हे खटले दाखल करण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वी म्हणजे 17 ऑगस्ट रोजी केस दाखल करण्यात आली आहे. आज सकाळी सीबीआयने मनिष सिसोदीया यांच्यासह काही सरकारी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी छापे मारले. यावेळी सीबीआयला या अधिकाऱ्याच्या घरी काही गोपनीय कागदपत्रे सापडल्याचं सांगितलं जात आहे. एखाद्या सरकारी अधिकाऱ्याच्या घरी अशा प्रकारचे कागदपत्रं असायला नको होती, असं सीबीआयचं म्हणणं आहे.

सीबीआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेड दरम्यान एका एक्साईज अधिकाऱ्याच्या घरी एक्साईज पॉलिशीशी संबंधित गोपनीय फाईल सापडली आहे. या फाईलमध्ये एक्साईज पॉलिसीबाबत सिक्रेट नोटिंग करण्यात आली होती. नियमानुसार ही फाईल अधिकाऱ्यांच्या घरी असता कामा नये. मात्र, आतापर्यंतच्या रेडमध्ये कोणत्याही प्रकारची कॅश सापडलेली नाही. दारू घोटाळ्यात सिसोदिया यांच्यासहीत 15 लोकांची नावे आहेत. ज्यांनी एक्साईज धोरणाचा फायदा उठवला आहे, अशा कंपन्यांच्या डायरेक्टर्सची नावेही एफआयआरमध्ये नोंदवण्यात आली आहेत. दरम्यान, गेल्या नऊ तासांपासून सिसोदिया यांच्या घराची झाडाझडती सुरूच आहे. त्यामुळे सिसोदिया यांना अटक होणार की नाही? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हे सुद्धा वाचा

सात राज्यात धाडसत्रं

अबकारी पॉलिसीत अनियमितता असल्याप्रकरणी आज सीबीआयने सिसोदिया यांच्या घरावर छापेमारी केली. निवृत्त एक्साईज कमिश्नर आरव गोपी कृष्ण यांच्याही घरावर सीबीआयने छापे मारले. सीबीआयने एकूण 19 ठिकाणी छापे मारले आहेत. या शिवाय सीबीआयने आज सात राज्यात 21 ठिकाणी छापेमारी केली आहे. इतर दोन अधिकाऱ्यांच्या निवासस्थानीही धाड मारण्यात आली आहे. अचानक झालेल्या या छापेमारीमुळे आपमध्ये खळबळ उडाली आहे.

त्यांना वरतून आदेश आहेत

सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयने छापा मारल्याची माहिती मिळाल्यानंतर सिसोदिया यांच्या घराबाहेर आप कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. घाबरू नका. सिसोदियांना त्रास देण्याचे एजन्सींना वरतून आदेश दिले गेले आहेत, असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. एका ऑनलाईन पत्रकार परिषदेतूनही त्यांनी संवाद साधला. आमच्या मार्गात आणि मोहिमेत अनेक अडथळे निर्माण केले जातील. सिसोदियांच्या विरोधातील ही पहिली छापेमारी नाहीये. माझ्या आणि माझ्या मंत्र्यांच्या विरोधातही छापे मारले आहेत. मात्र, त्यांच्या हाती काहीच लागले नाही, असं केजरीवाल म्हणाले.

Non Stop LIVE Update
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.