राहुल गांधी जिथे जातात, तिथे काँग्रेसची मतं कमी करतात : मुख्यमंत्री

अशोक चव्हाण यांना विनंती करेन की भोकरमध्ये राहुल गांधींना आणा. ते जिथे जातात, तिथे काँग्रेसची मतं कमी करतात, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

राहुल गांधी जिथे जातात, तिथे काँग्रेसची मतं कमी करतात : मुख्यमंत्री
अनिश बेंद्रे

|

Oct 15, 2019 | 8:32 AM

नांदेड : मी अशोक चव्हाण यांना विनंती करतो, की भोकरमध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची सभा ठेवा, कारण राहुल गांधी ज्या ज्या मतदारसंघात जातात, तिथे ते काँग्रेसची मतं कमी केल्याशिवाय राहत नाहीत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शालजोडे (Devendra Fadnavis taunts Rahul Gandhi) लगावले.

नांदेडमधील भोकर मतदारसंघात भाजपचे उमेदवार बापूसाहेब गोर्ठेकर यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली ‘एकीकडे राहुल गांधी यांच्यासारखं नेतृत्व काँग्रेसला लाभलेलं आहे. माझी तर खूप इच्छा आहे, या भोकर मतदारसंघामध्ये राहुल गांधींची सभा झालीच पाहिजे. मी तर भोकरचे काँग्रेस उमेदवार अशोक चव्हाण यांना विनंती करेन की भोकरमध्ये राहुल गांधींना आणा. कारण राहुल गांधी ज्या ज्या मतदारसंघात जातात, तिथे ते काँग्रेसची मतं कमी केल्याशिवाय राहत नाहीत’ असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

‘या ठिकाणी भाजपचाच उमेदवार निवडून येणार. अशोक रावांना तुम्ही लोकसभेतच घरी बसवलंत. मला असं वाटलं होतं की अशोकराव पुढच्या लोकसभा निवडणुकांची तयारी करायला लागले असतील. पण त्यांना राहावलेलं दिसत नाही. कारण ते पुन्हा विधानसभा निवडणुकीला उभे राहिले आहेत. मला विश्वास आहे, लोकसभेला तुम्ही त्यांना घरचा रस्ता दाखवलात.  आता विधानसभेलाही तुम्ही त्यांना घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही’ असा विश्वासही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis taunts Rahul Gandhi) व्यक्त केला.

विनोद तावडेंचा नियतीनेच ‘विनोद’ केला, अशोक चव्हाणांचे चिमटे

‘प्रतापराव तुम्ही पहिले जायंट किलर झालात, आता बापूसाहेब गोरठेकर दुसरे जायंट किलर होणार’ असंही मुख्यमंत्री म्हणाले. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर उभे राहिलेल्या प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी महाराष्ट्रातून निवडणुकीला उभे राहिलेल्या काँग्रेसच्या एकमेव तत्कालीन खासदाराला अर्थात अशोक चव्हाण यांना पाडलं होतं. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेलेले बाळू धानोरकर हे काँग्रेसकडून निवडून आलेले राज्यातील एकमेव खासदार आहेत.

यंदा भोकर मतदारसंघातून आमदार अमिता चव्हाण यांच्याऐवजी त्यांचे पती आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण पुन्हा विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरत आहेत. त्यामुळे अशोक चव्हाणांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरत आहे. भाजपने श्रीनिवास देशमुख गोरठेकर यांना निवडणुकीचं तिकीट दिलं आहे.

राहुल गांधी हे विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराऐवजी बँकॉकला गेल्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं. मात्र रविवारी राहुल गांधींनी महाराष्ट्रात सभा घेत काँग्रेसला बळ देण्याचा प्रयत्न केला.

अशोक चव्हाणांच्या भोकरमध्ये अर्जमाघारीचा विक्रम

एका दिवसात तब्बल 84 अर्ज मागे घेण्याचा विक्रम नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघात नोदवला गेला. अशोक चव्हाण उमेदवार असलेल्या भोकरमध्ये तब्बल 134 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 91 अर्ज पात्र ठरले. तब्बल 91 उमेदवार असल्याने प्रशासन आणि अशोक चव्हाण यांना डोकेदुखी ठरणार होती. मात्र अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल 84 उमेदवारांनी माघार घेतली. आता भोकरमध्ये केवळ सात उमेदवार रिंगणात आहेत.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें