झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीचे समन्स

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. हेमंत सोरेन यांना ईडीकडून समन्स पाठवण्यात आलं आहे.

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीचे समन्स
Follow us
| Updated on: Nov 02, 2022 | 11:32 AM

नवी दिल्ली : झारखंडचे (Jharkhand) मुख्यमंत्री (CM) हेमंत सोरेन (Hemant Soren) यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. हेमंत सोरेन यांना ईडीकडून समन्स पाठवण्यात आलं आहे. अवैध उत्खनन प्रकरणात हेमंत सोरेन यांना हे समन्स ईडीने पाठवलं आहे. सोरेने यांना उद्या गुरुवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी अंमलबजावणी संचालनालय ‘ईडी’ने हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानी छापेमारी केली होती. या छापेमारीमध्ये ईडीकडून हेमंत सोरेन यांचं एक पासबुक आणि चेकबूक जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे निकटवर्तीय आणि झारखंड मुक्ती मोर्चा ‘झामुमो’चे नेते पकंज मिश्रा यांच्या घरावर देखील छापेमारी करण्यात आली होती.

पकंज मिश्रा यांच्या घरावर छापेमारी

अवैध उत्खनन प्रकरणात हेमंत सोरेन यांच्या अडचणी वाढतच आहेत. हेमंत सोरेन यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीने दिले आहेत. दरम्यान यापूर्वी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या घरावर देखील छापेमारी करण्यात आली होती. या छाप्यात हेमंत सोरेन यांचं एक पासबुक आणि चेकबुक जप्त करण्यात आलं आहे. दुसरीकडे हेमंत सोरेन यांचे निकटवर्तीय आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते पंकज मिश्रा यांच्या घरावर देखील छापेमारी करण्यात आली आहे. पंकजा मिश्रा हे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात देखील आरोपी असून, त्यांना 19 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत.

हे सुद्धा वाचा

अवैध खाण उत्खनन प्रकरणात आरोप

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर अवैध खाण उत्खनन प्रकरणात आरोप करण्यात आले आहेत. ऑगस्टमध्ये निवडणूक आयोगाने त्यांना अपात्र ठरवण्यासंदर्भातील एका याचिकेवर राज्यपाला रमेश बैस यांच्याकडे आपले मत नोंदवले होते. मात्र याबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. आता उद्या चौकशीतून काय समोर येणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.