AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : संजय राऊत काय आहे, दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वांना ठाऊक; ईडीच्या चौकशीवरून राऊतांचा इशारा

Sanjay Raut : शिंदे गटाने अनेकांच्या पक्षात नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. कोणत्या नियुक्त्या? शिवसैनिक ते इथेच आहेत. हे कोणत्या नियुक्त करत आहेत? त्यांना कोणता अधिकार आहे? हा पोरखेळ चालू आहे. त्याकडे आम्ही फार गांभीर्याने पाहत नाही.

Sanjay Raut : संजय राऊत काय आहे, दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वांना ठाऊक; ईडीच्या चौकशीवरून राऊतांचा इशारा
संजय राऊत काय आहे, दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वांना ठाऊक; ईडीच्या चौकशीवरून राऊतांचा इशाराImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 29, 2022 | 12:18 PM
Share

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी ईडीच्या (ED) नोटिशीवरून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मला अजून नोटिस आली नाही. ठीक आहे परत आल्यावर पाहू काय ते. आम्ही कायद्याच पालन करणारी लोक आहोत. राजकीय दबावासाठी सर्व चालल आहे. माझा आवाज बंद करण्यासाठी आहे हे सर्व सुरू आहे. संजय राऊत काय आहेत हे दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वांना माहित आहेत, असा इशारा देतानाच माझ्यावर किती दबाव आला, कोणत्याही माध्यमातून दबाव आला तरी हा संजय राऊत शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेबरोबर राहील. कुणापुढेही गुडघे टेकणार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हा इशारा दिला आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल हे मला माहीत नाही. मंत्रिमंडळ विस्तार (cabinet expansion) का रखडला हे हम दो, हमारे दोच सांगू शकतील. आज एक महिना होत आला आहे. अजून काय होईल मला माहिती नाही, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

संजय राऊत हे मीडियाशी संवाद साधत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्यमंत्री शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांना भेटायला गेले. लिलाधर डाके, मनोहर जोशी हे लोक बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत कडवट शिवसैनिक म्हणून अनेक वेळा शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. डाके आणि जोशी यांच्याकडे शिकण्यासारखे आहे. अशा कडवट शिवसेनेकांना मुख्यमंत्री भेटले. ते नक्कीच त्यांच्यापासून प्रेरणा आणि बोध घेतील, असं राऊत म्हणाले.

तर टीका करण्यासारखं काही नाही

मुख्यमंत्री राज्याचा दौरा करतात ही चांगली गोष्ट आहे. राज्यातील जनतेसाठी ही चांगली गोष्ट आहे. राज्यात महापूर आहे. लोक वाहून गेले आहेत. शंभराच्यावर लोकांचा बळी गेला आहे. मोठ्या प्रमाणात शेती वाहून गे लेली आहे. विरोधी पक्ष नेते अजित पवार देखील विदर्भात आहेत, असं ते म्हणाले. अजून महाराष्ट्रात मंत्रिमंडळाची स्थापना होऊ शकलेली नाही.दिल्लीमध्ये वाऱ्या आणि फेऱ्या वाढलेल्या आहेत. त्यातून वेळ काढून जर राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील जनतेचा प्रश्न समजून घेण्यासाठी फिरणार असतील तर त्याच्यावरती टीका करण्यासारखं काही नाही, असंही ते म्हणाले.

तुमचं अस्तित्व दाखवा

शिंदे गटाने अनेकांच्या पक्षात नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. कोणत्या नियुक्त्या? शिवसैनिक ते इथेच आहेत. हे कोणत्या नियुक्त करत आहेत? त्यांना कोणता अधिकार आहे? हा पोरखेळ चालू आहे. त्याकडे आम्ही फार गांभीर्याने पाहत नाही. आज ही नियुक्ती, उद्या ती, परवा ती नियुक्ती झाली. कोणता पक्ष आहे? आपला संबंध काय इथे. उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांनी उभ्या केलेल्या पक्षाच्या सावलीत आपण मोठे झालो. त्याची फळं खाल्ली. आता आपण बाजूला झालेले आहात आणि आता तुमचा पक्ष स्थापन करा आणि तुमचे अस्तित्व दाखवा, असं आव्हानच त्यांनी दिलं.

Follow Us
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का! 19 सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता...
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता सलाईन आणि पाणीही...
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
Manoj Jarange Patil | गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?