AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Exit Poll Results 2024 : आधी निकाल एक्झिट पोलचा, मग मतदानाचा, देशाचे लक्ष वेधणाऱ्या या आहेत महत्वाचा लढती

19 एप्रिल 2024 पासून सुरु झालेली लोकसभेची रणधुमाळी 1 जून रोजी संध्याकाळी संपला. लोकसभेच्या 543 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीचा एक्झिट पोल काही वेळातच समोर येणार आहे. या एक्झिट पोलमधून कुणाचे भाग्य खुलणार? कोणत्या महत्वाचा लढतीमध्ये काय होणार? याचा घेतलेला अंदाज.

Exit Poll Results 2024 : आधी निकाल एक्झिट पोलचा, मग मतदानाचा, देशाचे लक्ष वेधणाऱ्या या आहेत महत्वाचा लढती
Exit Poll Results 2024Image Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Jun 01, 2024 | 4:17 PM
Share

देशाच्या 18 व्या लोकसभेसाठी 19 एप्रिल 2024 पासून मतदानाला सुरवात झाली. सात टप्प्यात लोकसभा निवडणूक झाली. निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा आता खाली बसला आहे. तर, शेवटच्या टप्प्यातील मतदानाचा आजचा अखेरचा दिवस आहे. सायंकाळी 5 वाजता मतदानाची वेळ संपल्यानंतर एक्झिट पोलचे निकाल हाती येण्यास सुरवात होईल. विशेष म्हणजे निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच देशातील जनतेचा कल कुणाच्या बाजूने आहे याचा अंदाज एक्झिट पोलमधून ( Exit Poll Results 2024 ) समोर येणार आहे. त्यामुळे या एक्झिट पोलमधून देशाचे चित्र स्पष्ट होणार असल्याने अवघ्या देशाचे त्याकडे लक्ष लागले आहे.

विविध न्यूज चॅनल्स आणि रिसर्च एजन्सींकडून हे एक्झिट पोल जाहीर केले जातात. अनेकदा या एक्झिट पोलमधून निवडणूक निकालाचा अंदाज येतो. ते काही वेळा योग्य असतात तर काही ते फेलही ठरतात. लोकसभा निवडणुकीसोबत यावेळी सिक्कीम ( Sikkim ), अरुणाचल प्रदेश ( Arunachal Pradesh ), ओडिशा ( Odisha ) आणि आंध्रप्रदेश ( Andhra Pradesh ) या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही झाल्या आहेत. त्यामुळे देशाचे पंतप्रधान कोण यासोबतच चार राज्यांचे मुख्यमंत्री कोण याचाही अंदाज एक्झिट पोलमधून समोर येणार आहेत.

देशात या आहेत सर्वात महत्वाच्या लढती…

दोन वेळा पंतप्रधान राहिल्यानंतर आता माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या विक्रमाची बरोबरी करण्याची तयारी नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) करत आहेत. वाराणसी हा नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ आहे. कॉंग्रेसने मोदी यांच्याविरोधात अजय राय यांना उमेदवारी दिली आहे. मोदी यांचा विजय पक्का मानला जात असला तरी अजय राय यांचा किती मतांनी पराभव होणार हे 4 जूनला कळणार आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी अमेठी आणि वायनाड हे मतदारसंघ सोडून पहिल्यांदाच रायबरेली मतदारसंघातून लढत आहेत. सोनिया गांधी यांनी लोकसभेऐवजी राज्यसभेचा मार्ग धरला. सोनिया गांधी यांचा हा मतदारसंघ त्यांनी राहुल गांधी यांना दिला. भाजप नेते दिनेश प्रताप सिंह हे राहुल गांधी यांच्याविरोधात उभे आहेत. 2019 च्या निवडणुकीत राहुल गांधी यांनी अमेठीमधून निवडणूक लढविली होती. मात्र, भाजपच्या स्मृती इराणी यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह ( Amit Shah ) हे गुजरातच्या गांधीनगरमधून लढत आहेत. काँग्रेसच्या सोनल पटेल त्यांच्याविरोधातील उमेदवार आहेत. देशाच्या राजकारणात मोदी-शहा जोडी सध्या गाजत आहे. त्यामुळे गांधीनगरची जागा भाजपसाठी महत्वाची आहे. अभिनेत्री कंगना यांनी भाजपच्या तिकीटावर रनौत मंडीमधून निवडणूक लढविली आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे विक्रमादित्य सिंह लढत आहेत.

महाराष्ट्राच्या प्रमुख लढती

राज्यातील बारामती, नागपूर, कल्याण, ठाणे, दक्षिण मध्य मुंबई, सिंधुदुर्ग या जागांकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. बारामतीमध्ये शरद पवार ( Sharad Pawar ) यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांची लढत अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार ( Sunetra Pawar ) यांच्याशी होत आहे. एकाच घरातील हे प्रतीस्पर्धी उमदेवार असल्याने बारामतीकर कोणत्या राष्ट्रवादी पक्षाला मतदान करतात याचा निकाल लागणार आहे.

नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) यांची काँग्रेसच्या विकास ठाकरे ( Vikas Thackeray ) यांच्याशी लढत होत आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने विकास ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे वंचितची जादू चालणार का? याची प्रतीक्षा आहे. दुसरीकडे रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Narayan Rane ) पुन्हा एकदा आपले नशीब अजमावीत आहेत. गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत त्यांचा मुलगा निलेश राणे यांचा ठाकरे गटाचे विनायक राऊत यांनी पराभव केला होता. मात्र, आता खुद्द नारायण राणे या निवडणुकीत उतरल्याने या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

शिवसेना पक्ष फुटल्यानंतर ही निवडणूक होत असल्याने साहजिकच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांचा बालेकिल्ला समजला जाणारा ठाणे लोकसभा मतदारसंघ आणि त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे ( Shrikant Shinde ) यांचा कल्याण या दोन्ही मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे नरेश म्हस्के ( Narsh Mhaske ) आणि ठाकरे गटाचे विद्यमान खासदार राजन विचारे ( Rajan Vichare ) यांच्यात लढत होत आहे. तर, कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे आणि ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांच्यात सामना होत आहे.

तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.