AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ग्रामपंचायत निवडणुकीत कुणाची चांदी? कागदपत्रांसाठी उमेदवारांची लूट!

अनेक ठिकाणी जातपडताळणी कार्यालयात उमेदवारांची लूट सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अक्षरश: रांगा लावून उमेदवारांकडून पैसे घेत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत कुणाची चांदी? कागदपत्रांसाठी उमेदवारांची लूट!
| Edited By: | Updated on: Jan 15, 2021 | 8:09 PM
Share

औरंगाबाद: ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना आपलं जातपडताळणी प्रमाणपत्र देणं बंधनकारक आहे. मात्र अनेक ठिकाणी जातपडताळणी कार्यालयात उमेदवारांची लूट सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अक्षरश: रांगा लावून उमेदवारांकडून पैसे घेत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता जातपडताळणी केंद्रांवर गर्दी होत आहे. अशावेळी कागदपत्र दाखल करुन घेताना उमेदवारांकडून 100 ते 200 रुपये घेतले जात आहेत. (extortion of candidates in Gram Panchayat outside Aurangabad Caste Verification Office)

ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. त्यासाठी उमेदवारांना जातपडताळणी प्रमाणपत्र आवश्यक आहे. अशावेळी किमान प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल केल्याची पावती तरी निवडणूक आयोगाकडे सादर करावी लागते. त्यामुळे सध्या जातपडताळणी केंद्राबाहेर मोठ्या रांगा लागल्या आहेत. औरंगाबादच्या जातपडताळणी केंद्राबाहेरही सध्या हेच चित्र पाहायला मिळत आहे. मात्र याठिकाणी इच्छुक उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात पैसे हडपण्याचा प्रकार सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.

राखीव जागांवरील उमेदवारांसाठी सवलत

राखीव जागांवर ग्रामपंचायत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक सवलत देण्यात आली आहे. जात वैधता प्रमाणपत्राऐवजी पडताळणी समितीकडे हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी केलेल्या अर्जाची सत्यप्रत अथवा पोचपावती किंवा अर्ज केल्याबाबतचा कोणताही पुरावा सादर करण्याची मूभा देण्यात आलीय. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी ही माहिती दिली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 30 डिसेंबर 2020 पर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. राखीव जागांवर निवडणूक लढवण्यासाठी नामनिर्देशपत्र दाखल करताना जात वैधता प्रमाणपत्रासाठी केलेल्या अर्जाबाबतचा पुरावा सादर करण्याबरोबरच एक हमीपत्रही देणं गरजेचं आहे. विजयी झाल्याच्या दिनांकापासून 12 महिन्यांच्या आत पडताळणी समितीने दिलेले जात वैधता प्रमाणपत्र सादर केलं जाईल, असं हमीपत्रात नमूद करावं लागणार आहे.

ग्राम पंचायत निवडणुकांबाबत महत्त्वाची माहिती

1. जात प्रमाणपत्राची पडताळणी आणि वैधता प्रमाणपत्र ऑनलाइन मिळेल 2. जात पडताळणीचा अर्ज एक खिडकी योजनेतून मिळेल 3. जातपडताळणी समितीला द्यावयाचा अर्ज तहसीलमध्ये मिळेल 4. निवडणूक जिंकल्यानंतर वैधता प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रस्तावाची पोचपावती, ऑनलाइन पैसे भरल्याची पावती 12 महिन्यांत द्यावी लागेल 5. उमेदवाराला एका प्रभागातून एकच उमेदवारी अर्ज भरता येणार 6. अर्ज ऑनलाईन भरल्यानंतर हमीपत्र आणि घोषणापत्र निवडणूक अधिकाऱ्याला द्यावे 7. खर्च हिशेब देताना हमीपत्र, अपत्यांचे प्रमाणपत्र, शौचालय वापर प्रमाणपत्र, डिपॉझिटची पावती द्यावी लागेल 8. 190 मुक्त चिन्हांपैकी उमेदवाराला 5 निवडणूक चिन्हे निवडता येणार 9. एका प्रभागात एका उमेदवाराचे चिन्ह दुसऱ्या उमेदवाराला मिळणार नाही 10. ग्रामपंचायतीचा थकबाकीदार, ठेकेदार नसल्याचे प्रमाणपत्र, नावात बदल नसल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागेल 11. 7 आणि 9 सदस्यांच्या पंचायतीत खर्च मर्यादा 25 हजार रुपये 12. 11 आणि 13 सदस्यांच्या पंचायतीत खर्च मर्यादा 35 हजार रुपये 13. 15 आणि 17 सदस्यांच्या पंचायतीत खर्च मर्यादा 50 हजार रुपये 14. खुल्या प्रवर्ग उमेदवारांसाठी 500 रुपये डिपॉझिट 15. SC-ST, OBC उमेदवारांसाठी 100 रुपये डिपॉझिट

संबंधित बातम्या:

तुमच्या ग्रामपंचायत निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम एका क्लिकवर

हर्षवर्धन जाधव ग्रामपंचायतीच्या राजकारणातून बाद? संजना जाधवांची एन्ट्री!

extortion of candidates in Gram Panchayat outside Aurangabad Caste Verification Office

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.