“दादा, तुम्ही अविश्वास ठराव तर आणा, मग आघाडीचं दाखवतो”

गोकुळ निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यात नवीन राजकीय समीकरणं जुळण्याचे संकेत हसन मुश्रीफ यांनी दिले. (Hasan Mushrif taunts Chandrakant Patil )

दादा, तुम्ही अविश्वास ठराव तर आणा, मग आघाडीचं दाखवतो
Chandrakant Patil
Follow us
| Updated on: Mar 12, 2021 | 3:52 PM

कोल्हापूर : “महाविकास आघाडीमध्ये समन्वय नाही म्हणणारे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सरकारवर अविश्वास ठराव आणावा, त्यानंतर त्यांना समजेल की तिघांची आघाडी किती भक्कम आहे” असा टोला राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी लगावला. चंद्रकांत पाटील यांना महाविकास आघाडीत बेबनाव असल्याचं विधान दोन दिवसांपूर्वी केलं होतं, त्याला मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिलं. (Hasan Mushrif taunts Chandrakant Patil over coordination in Maha Vikas Aghadi)

गोकुळ दूध संघातही आघाडीचे संकेत

माजी मंत्री अनिल गोटे यांनी पोलिसांवर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचाही हसन मुश्रीफ यांनी समाचार घेतला. याबाबत गृहमंत्र्यांनी योग्य ती कारवाई करावी, असं मुश्रीफ म्हणाले. आगामी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीविषयी विचारलं असता महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक एकत्र लढवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं हसन मुश्रीफ म्हणाले. त्यामुळे गोकुळ निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यात नवीन राजकीय समीकरणं जुळण्याचे संकेत दिले.

चंद्रकांत पाटील-मुश्रीफ यांचा कलगीतुरा

चंद्रकांत पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यात अनेक वेळा कलगीतुरा रंगताना पहायला मिळालं. मी कोल्हापूर सोडून कोथरुडमधून निवडणूक लढलो, याचा विरोधकांकडून कायम उल्लेख केला जातो. माझी आताही कोल्हापुरातून निवडणूक लढण्याची तयारी आहे. हवं तर कोल्हापुरातील कोणत्याही आमदाराने राजीनामा द्यावा, मी पोटनिवडणुकीला उभा राहीन. या निवडणुकीत हरल्यास मी हिमालयात निघून जाईन, असे चंद्रकांत पाटील यांनी ठणकावून सांगितले होते.

‘साधाभोळा स्वभाव आणि विरोधकांचा काटा काढायचा, चंद्रकांतदादांचे दोन स्वभाव’

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे लोकांना भरपूर मदत करतात. त्यांचे दोन स्वभाव आहेत. एक साधाभोळा आणि दुसरा म्हणजे विरोधकांचा काटा काढायचा, अशी टीका हसन मुश्रीफ यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. चंद्रकांतदादांनी मला खूप त्रास दिला. सत्तेत असताना त्यांनी माझ्यावर आयकर विभागाच्या धाडी टाकल्या. ईडीच्या धाडी टाकल्या. कोल्हापूर जिल्हा बँकप्रकरणीही त्रास दिल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितले होते.

संबंंधित बातम्या:

कोल्हापुरातून निवडून नाही आलो तर राजकारण सोडून हिमालयात जाईन -चंद्रकांत पाटील

चंद्रकांतदादांना हिमालयात जावं लागणार नाही; मुश्रीफ यांची टोलेबाजी सुरूच

(Hasan Mushrif taunts Chandrakant Patil over coordination in Maha Vikas Aghadi)

Non Stop LIVE Update
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.