चहापेक्षा किटली गरम; हसन मुश्रीफांची दरेकरांवर बोचरी टीका

'चहापेक्षा किटली गरम' असे म्हणत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

चहापेक्षा किटली गरम; हसन मुश्रीफांची दरेकरांवर बोचरी टीका
Follow us
| Updated on: Oct 22, 2020 | 10:20 PM

अहमदनगर : ‘चहापेक्षा किटली गरम’, असे म्हणत अहमदनगरचे पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांच्यावर बोचरी टीका केली आहे. फडणवीसांना बदनाम करण्यासाठी राष्ट्रवादीकडून खडसेंचा (Eknath Khadse) वापर केला जातोय, असा आरोप दरेकर यांनी केला होता. त्यावर मुश्रीफ यांनी पलटवार केला आहे.

प्रवीण दरेकर म्हणाले होते की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्यासाठी एकनाथ खडसे यांचा वापर करत आहे. त्यावर आता हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी उत्तर दिलं आहे. एकनाथ खडसे हे गेल्या चार वर्षांपासून बोलत आहेत, त्यावेळी प्रवीण दरेकर यांना कोणी अडवलं होतं? असा सवाल मुश्रीफ यांनी केला आहे.

मुश्रीफ म्हणाले की, एकनाथ खडसे यांची भारतीय जनता पक्षाने मनधरणी करायला हवी होती, तसेच त्यांचे गैरसमज होते तर ते दूर करायला हवे होते. हे करण्यापासून प्रवीण दरेकर यांना कोणी रोखले होते? त्यांनी खडसेंच्या पाया पडायला हवे होते.

मुश्रीफ म्हणाले की, दरेकर तर नुकतेच भाजपमध्ये गेले आहेत, एकनाथ खडसे हे सिनियर आहेत, त्यांना रोखायला हवे होते. दरेकर म्हणतायत की राष्ट्रवादी खडसेंचा वापर करत आहे, परंतु खडसे हे काही आज बोलत नाहीएत. ते गेल्या चार वर्षांपासून बोलत आहेत. त्यांची खदखद व्यक्त करत आहेत. त्यांना भाजपमधील कोणीही अडवले नाही. कारण खडसे यांनी भारतीय जनता पक्ष सोडावा, असेच सर्वांना वाटत होते.

काय म्हणाले होते दरेकर 

“विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत काहींना आकस आणि पोटशूळ आहे. त्यांनी या राज्याचे 5 वर्ष सक्षमपणे नेतृत्व केले हे काही लोकांना पचनी पडले नाही. त्यांच्यावर कोणतेही आरोप करता येत नाहीत यासाठी त्यांची छबी बदनाम करण्यासाठी खडसेंचा गेम करत राष्ट्रवादीत घेतलं,” असा आरोप प्रवीण दरेकर यांनी खडसेंवर केला होता.

संबंधित बातम्या

Pravin Darekar | देवेंद्र फडणवीसांची छबी बदनाम करण्याचा प्रयत्न : प्रवीण दरेकर

लवकरात लवकर भरपाई द्या; नासलेली पिकं घेऊन संतप्त शेतकऱ्यांनी हसन मुश्रीफ यांची गाडी अडवली

‘खडसे सिर्फ झांकी है, बहुत कुछ बाकी है’; मुश्रीफ यांचा सूचक इशारा

विरोधी पक्षाने त्यांच्या काळात सरसकट कधी मदत दिली? त्यांनी शपथ घेऊन सांगावं : हसन मुश्रीफ

(Hasan Mushrif’s strong reply to Praveen Darekar for criticizing NCP about Eknath Khadse)

Non Stop LIVE Update
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.