विधीमंडळात धडकण्यासाठी मुंबईचे 11 विद्यमान नगरसेवक इच्छुक, चौघांची बंडखोरी

मुंबई महापालिकेतील नऊ नगरसेवकांना पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली आहे तर दोन नगरसेवकांनी बंडाचा झेंडा फडकावत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

विधीमंडळात धडकण्यासाठी मुंबईचे 11 विद्यमान नगरसेवक इच्छुक, चौघांची बंडखोरी
Follow us
| Updated on: Oct 06, 2019 | 10:51 AM

मुंबई : नगरसेवकपदी निवडून आल्यानंतर विधीमंडळात हजेरी लावण्याची अनेकांची इच्छा असते. मुंबईतील विधानसभेच्या 36 जागांवर विद्यमान आणि माजी आमदार निवडणूक लढवत आहेतच, तसंच आमदारकीच्या इच्छेने शिवसेना, भाजप, काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि मनसे या पक्षांच्या विद्यमान 11 नगरसेवकांनीही (Sitting Corporators in Vidhansabha Election) आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

नऊ नगरसेवकांना पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली आहे तर दोन नगरसेवकांनी बंडाचा झेंडा फडकावत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

भाजप, शिवसेना आणि काँग्रेसच्या सहा माजी नगरसेवकांनीही या निवडणुकीत आपले नशीब आजमावायचं ठरवलं आहे. त्यामध्येही चार माजी नगरसेवकांना पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली आहे, तर दोघा माजी नगरसेवकांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे अर्जमाघारीची मुदत संपेपर्यंत बंडोबांना थंड करण्याची डोकेदुखी पक्षांसमोर आहे.

विधानसभेला अधिकृतपणे उतरलेले 9 विद्यमान नगरसेवक

शिवसेना – महापौर विश्वनाथ महाडेश्वर – वांद्रे (पूर्व) रमेश कोरगावकर – भांडुप (पश्चिम) दिलीप लांडे – चांदिवली

भाजप – पराग शहा – घाटकोपर (पूर्व)

काँग्रेस – आसिफ झकेरीया – वांद्रे (पश्चिम) जगदिश अमीन कुट्टी – अंधेरी (पूर्व)

मनसे – संजय तुर्डे – कालिना

समाजवादी पक्ष – रईस शेख – भिवंडी

अखिल भारतीय सेना – गीता गवळी – भायखळा

समाजवादी पक्षाचे गटनेते आणि नगरसेवक रईस शेख यांना भायखळा मतदारसंघ सोडून पक्षाच्या आदेशाने मुंबईबाहेर भिवंडीत निवडणूक लढवावी लागत आहे.

माजी नगरसेवक –

शिवसेना – विठ्ठल लोकरे – मानखुर्द शिवाजीनगर यामिनी जाधव – भायखळा

काँग्रेस – सुरेश कोपरकर – भांडुप (पश्चिम) अजंता यादव – कांदिवली (पूर्व)

वडाळा मतदारसंघात भाजपचे उमेदवार कालिदास कोळंबकर यांच्याविरोधात आक्रमक होत उमेदवारीसाठी अडून बसलेल्या शिवसेनेच्या माजी महापौर आणि विद्यमान नगरसेविका श्रद्धा जाधव (Sitting Corporators in Vidhansabha Election) यांची समजूत काढण्यात शिवसेना पक्षप्रमुखांना वेळीच यश आलं. त्यामुळे अर्ज न भरता त्यांनी माघार घेतली.

बंडखोर आजी – माजी नगरसेवक

काँग्रेसचे नगरसेवक सुफियान वणू (मतदारसंघ वडाळा- अँटॉप हिल) – मानखुर्द मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज

शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका राजुल पटेल यांचा बंडखोरी करत वर्सोवा मतदारसंघात शिवसेना-भाजप महायुतीचे घटकपक्ष असलेल्या विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाच्या विद्यमान आमदार भारती लव्हेकर यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज

राज्यभरात 5 हजार 543 उमेदवारांपैकी 4 हजार 739 उमेदवारांचे अर्ज वैध 

भाजपचे माजी नगरसेवक मुरजी पटेल (यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने नगरसेवकपद रद्द झाले) यांनी अंधेरी (पूर्व) मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार रमेश लटके यांच्याविरोधात बंड पुकारत उमेदवारी अर्ज दाखल केला

भाजपचे विद्यमान उमेदवार राम कदम यांच्याविरोधात त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय भालेराव यांनी बंड पुकारत घाटकोपर (पश्चिम) मतदारसंघात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला

Non Stop LIVE Update
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक.
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार.
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?.
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल.
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?.
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.