Maharashtra Assembly Monsoon Session Live : राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर – खडसे

| Updated on: Aug 19, 2022 | 9:41 AM

Maharashtra Assembly Monsoon Session Live Updates आज पावसाळी अधिवेशनाचा  दुसरा दिवस (Second day of Monsoon session) आहे. पहिला दिवस चांगलाच वादळी ठरला. आज देखील विरोधक सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याची शक्यता आहे.

Maharashtra Assembly Monsoon Session Live : राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर - खडसे

आज पावसाळी अधिवेशनाचा  दुसरा दिवस (Second day of Monsoon session Live) आहे. पहिला दिवस चांगलाच वादळी ठरला. विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. नव्या सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अधिवेशनामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगताना पहायला मिळाले.  अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी (maharashtra assembly session Live) नव्या राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. मात्र त्यानंतर दुपारी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आल. दरम्यान आजचा दिवस देखील वादळी ठरण्याची शक्यता आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांना विविध प्रश्नांवरून कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. आपण जाणून घेणार आहोत अधिवेशनाबाबतची (assembly session Live) प्रत्येक अपडेट. दरम्यान आज दुसऱ्या दिवशी विरोधक चंगालेच आक्रमक झाले असून, विरोधकांकडून सरकारविरोधात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 18 Aug 2022 03:24 PM (IST)

    रायगडच्या पार्श्वभूमीवर पुण्यातही हायअलर्ट

    रायगडच्या पार्श्वभूमीवर पुण्यातही हायअलर्ट

    पुणे पोलीस आयुक्त अभिताप गुप्ता यांनी बोलावली अधिकाऱ्यांची बैठक

    – नागपूर पोलिसांनी जारी केलाय अलर्ट

    – रायगडमध्ये दोन बोट आढळल्याच्या पार्श्वभुमिवर अलर्ट

    – पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती

  • 18 Aug 2022 02:58 PM (IST)

    शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिमूरच्या दोन अस्थायी कर्मचाऱ्यांना लाच घेताना एसीबीने केली अटक

    चंद्रपूर- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिमूरच्या दोन अस्थायी कर्मचाऱ्यांना लाच घेताना एसीबीने केली अटक,

    प्रशिक्षण संस्थेमध्ये मानधन तत्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचा चार महिन्याचा थकीत पगार काढून दिल्यामुळे आणि उर्वरित तीन महिन्याच्या पगार काढून देण्यासाठी मागितली लाच,

    लाच घेणारा एक कर्मचारी मानधन तत्वावर तर दुसरा कंत्राटी तत्त्वावर करत होता कार्यरत,

    लाचेची बारा हजार रक्कम घेत असताना शांताराम राठोड गटनिदेशक आणि प्रशांत वांढरे निदेशक या दोघांना रंगेहात केली अटक

  • 18 Aug 2022 02:19 PM (IST)

    Maharashtra Assembly Monsoon Session Live : 'उद्धवजींच्या नेतृत्वात अजितदादांचं राज्य'; फडणवीसांची सभागृहात टोलेबाजी

    आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार फटकेबाजी केल्याचं पहायला मिळालं.

  • 18 Aug 2022 01:55 PM (IST)

    Maharashtra Assembly Monsoon Session Live : मंत्री असाल तुमच्या घरी, गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं

    विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे या आज चांगल्याच आक्रमक झाल्याच्या पहायला मिळाल्या.  पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधान परिषदेमध्ये गुलाबराव पाटील बोलत असताना निलम गोऱ्हे यांनी गुलाबराव पाटलांना चांगलच सुनावलं  आहे.  छातीवर हात ठेवून कसंल बोलता तुम्ही मंत्री असाल तुमच्या घरी असं निलम गोऱ्हे यांनी पाटलांना म्हटलं आहे.

  • 18 Aug 2022 01:37 PM (IST)

    Maharashtra Assembly Monsoon Session Live : राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर - खडसे

    आज पावसाळी अधिवेशनाचा दुसार दिवस आहे. दुसरा दिवसही अपेक्षेप्रमाणे वादळी ठरत आहे. विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. याचदरम्यान राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला आहे.

  • 18 Aug 2022 01:21 PM (IST)

    Assembly Monsoon Session Live : महागाईच्या मुद्द्यावरून नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल

    वाढत असलेल्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे अवघड झाले आहे. महागाई वाढतच आहे. वाढत्या महागाईवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारव जोरदार टीका केली आहे.

  • 18 Aug 2022 01:09 PM (IST)

    Assembly Monsoon Session Live : पांढऱ्या दाढीचा देशावर प्रभाव; भुजबळांची विधानसभेत टोलेबाजी

    आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी छगन भुजबळ यांनी सभागृहात जोरदार टोलेबाजी केल्याचं पहायला मिळत आहे. देशात पहिल्यांदाज दाढीवाला मुख्यमंत्री झ्याल्याचे त्यांनी म्हटलं आहे. माझी दाढी पांढरी आहे, तर एकनाथ शिंदे यांची दाढी काळी आहे. मात्र सध्या देशात पांढऱ्या दाढीवाल्यांचाच प्रभाव असल्याचे भूजबळ यांनी म्हटले आहे.

  • 18 Aug 2022 12:54 PM (IST)

    Assembly Monsoon Session Live : आम्ही गद्दार नव्हे खुद्दार; प्रताप सरनाईकांचं विरोधकांच्या घोषणाबाजीला प्रत्युत्तर

    आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशीही विधानसभा परिसरात गोंधळ पहायाला मिळाला. विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जोरदार आंदोलन केले. यावेळी विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या घोषणाबाजीला शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही गद्दार नसून खुद्दार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

  • 18 Aug 2022 12:37 PM (IST)

    Maharashtra Assembly Monsoon Session Live : देवेंद्र फडणवीस लाईव्ह

    Devendra Fadnavis Live  आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

  • 18 Aug 2022 12:32 PM (IST)

    Maharashtra Assembly Monsoon Session Live : जीएसटीच्या नावाखाली अनेक ठिकाणी लूट; भुजबळांचा हल्लाबोल

    जीएसटीवरून छगन भुजबळांचा सवाल

    जीएसटीच्या नावाखाली अनेक ठिकाणी लूट

    जीएसटीवरून छगन भूजबळ आक्रमक

  • 18 Aug 2022 12:18 PM (IST)

    Maharashtra Assembly Monsoon Session Live : जीएसटीच्या नावाखाली अनेक ठिकाणी लूट; भुजबळांचा हल्लाबोल

    गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला. या पुराचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान हा राज्यातील सध्याच्या घडीला असलेला सर्वात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे त्यावर चर्चा करण्यात यावी अशी मागणी विधानसभेत थोरात यांनी केली.

  • 18 Aug 2022 12:07 PM (IST)

    Maharashtra Assembly Monsoon Session Live : पालघरच्या आरोग्य प्रश्नांवरून अजित पवारांचा सरकारवर घणाघात

    Ajit Pawar Live : पालघरमध्ये आरोग्यचा प्रश्न गंभीर बनला आहे. जिल्ह्यात असे अनेक दुर्गम भाग आहेत  ज्यामध्ये अद्यापही आरोग्य सुविधा पोहोचू शकत नसल्याचे अजित पवार यांनी म्हटलं आहे.

  • 18 Aug 2022 11:49 AM (IST)

    Assembly Monsoon Session Live : अजितदादांच्या प्रश्नावर आरोग्यमंत्री निरुत्तर; तानाजी सांवंताची उडाली भंबेरी

    सध्या पालघर जिल्ह्यातील बालकांमधील हत्तीरोगाचा प्रश्न गाजत आहे. याच मुद्द्यावरून आज विरोधकांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना घेरल्याचे पहायला मिळाले. अजित पवार यांनी तानाजी सावंत यांना पालघर जिल्ह्यातील रिक्त वैद्यकीय जागांबाबत प्रश्न विचारला मात्र सावंत यांना उत्तर देता आले नाही. त्यामुळे विरोधकांनी त्यांची कोंडी केली. यावर उत्तर देताना हा प्रश्न आपण सोमवारी ठेवू असे तानाजी सावंत यांनी म्हटले आहे.

  • 18 Aug 2022 11:38 AM (IST)

    Maharashtra Assembly Monsoon Session Live : महाराष्ट्राला पोकळ घोषणा कळतात, घोषणाबाजीवरून सामंतांचा विरोधकांना टोला

    विरोधक आक्रमक झाले आहेत, राज्य सरकारच्याविरोधात विरोधकांची जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. आता या घोषणाबाजीला शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी प्रत्यत्तर दिले आहे. महाराष्ट्राला पोकळ घोषणा कळतात. सध्या विरोधक ज्या घोषणा देत आहेत त्या पोकळ घोषणा आहेत. मला पूर्ण खात्री आहे, सध्या जे लोक तिथे घोषणा देत आहेत, त्यातील अनेक शिंदे यांच्या बाजून आहेत. भविष्यात ते सर्व समोर येईलच. विरोध करणं हे विरोधकांचं कामच असतं असं सामंत यांनी म्हटलं आहे.

  • 18 Aug 2022 11:10 AM (IST)

    Maharashtra Assembly Monsoon Session Live : विधानसभेत पुन्हा राणे विरुद्ध भास्कर जाधव सामना

    विधानसभेत पुन्हा राणे विरुद्ध भास्कर जाधव सामना

    जाधव प्रश्न विचारत असताना नितेश राणे खाली बसून बोलले

    मध्ये बोलणाऱ्या नितेश राणेंना काहीतरी शिकवा - जाधव

    भास्कर जाधव आक्रमक

  • 18 Aug 2022 10:50 AM (IST)

    assembly session Live : विरोधक दबावाला बळी पडणार नाहीत - जयंत पाटील

    विरोधकांवर दबाव आणण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न - जयंत पाटील

    विरोधक दबावाला बळी पडणार नाहीत - जयंत पाटील

    पूर्वी ज्यांच्यावर आरोप झाले ते आता सत्तेत जाऊन बसले - जयंत पाटील

  • 18 Aug 2022 10:44 AM (IST)

    Assembly Monsoon Session Live : मराठवाड्यातील अतिवृष्टीवरुन विरोधकांची घोषणाबाजी

    पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस

    मराठवाड्यातील अतिवृष्टीवरुन घोषणाबाजी

    ईडी, सीबीआयवर हल्लाबोल, विरोधकांची  घोषणाबाजी

    विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन

  • 18 Aug 2022 10:38 AM (IST)

    Maharashtra Assembly Monsoon Session Live: विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन

    अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधक आक्रमक

    विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन

    सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

  • 18 Aug 2022 10:31 AM (IST)

    Monsoon Session Live : अवैध दारू प्रकरणात पीआय मोरेंना निलंबित करणार - फडणवीस

    विधानसभेचं कामकाज सरू

    अवैध दारू प्रकरणात पीआय मोरेंना निलंबित करणार - फडणवीस

    मोरे अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीआय

    अवैध दारू प्रकरणात आमदार नमिता मुंदडा यांनी केली होती तक्रार

    मुंदडांच्या तक्रारीनंतर कारवाईन न केल्याने कारवाई

  • 18 Aug 2022 10:11 AM (IST)

    Monsoon Session Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानभवनात दाखल

    आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानभवनात दाखल

    आजचा दिवसही वादळी ठरणार!

  • 18 Aug 2022 10:07 AM (IST)

    Monsoon Session Live : खडसेंची तोफ तीन वर्षानंतर विधान परिषदेत विरोधकांवर धडाडणार!

    राष्ट्रवादी पक्षप्रवेशानंतर एकनाथ खडसे यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले. मात्र आता एकनाथ खडसे हे विधान परिषदेचे आमदार झाले आहेत. त्यामुळे  आज अधिवेशनात एकनाथ खडसे तीन वर्षानंतर काय बोलतात याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. खडसे आज आपल्या खास शैलीमध्ये सत्ताधाऱ्यांचा समाचार घेण्याची शक्यता  आहे.

  • 18 Aug 2022 09:02 AM (IST)

    बच्चू कडू लाईव्ह

    नाराजीच्या अफेवर बच्चू कडू यांच स्पष्टीकरण

  • 18 Aug 2022 08:54 AM (IST)

    शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईची मुद्दा गाजणार?

    आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. विरोधकांकडून नुकसानभरपाईच्या मुद्द्यावरून  सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होऊ शकतो.

Published On - Aug 18,2022 6:59 AM

Follow us
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.