AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधान परिषद निवडणुकीत महायुतीला मोठा तडा… तीन आमदारांनी केला गेम; कुणाला टेन्शन?

महाराष्ट्रात विधान परिषद निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडे अंतर्गत संघर्ष पेटला आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत आमदारांचे बंड झाले आहे, तर महाविकास आघाडीत जागावाटपावरून मतभेद आहेत. पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे जाण्याची शक्यता असली तरी, दोन्ही आघाड्यांची डोकेदुखी वाढली असून, निवडणूक अधिक चुरशीची होणार आहे.

विधान परिषद निवडणुकीत महायुतीला मोठा तडा... तीन आमदारांनी केला गेम; कुणाला टेन्शन?
sunetra pawarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 03, 2026 | 4:36 PM
Share

राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकांचं पडघम वाजलं आहे. विधान परिषदेच्या जागा जिंकण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीने कंबरल कसलेली आहे. पण निवडणुकीचा फॉर्म्युलाच ठरत नसल्याने दोन्ही आघाड्यांमध्ये वाद निर्माण झाला आहे. महाविकास आघाडीत ठाकरे गटाने अमरावती आणि मराठवाड्याची जागा लढण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेसला ताप झाला आहे. तर दुसरीकडे अमरावतीच्या जागेसाठी अजितदादा गटाच्या आमदारांनी बंड पुकारल्याने महायुतीत बेबनाव निर्माण झाला आहे. त्यामुळे विधान परिषदेची निवडणुकीत अधिक रंजक आणि चुरशीची होणार असल्याचं दिसून येत आहे.

अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत पुन्हा बंड झालं आहे. दिलीप कडूंसाठी राष्ट्रवादीचे आमदार खोडके दांपत्य मैदानात उतरले आहेत. उमेदवाराच्या अधिकृत घोषणेआधीच महायुती विस्कटली आहे. श्रीकांत देशपांडेंपाठोपाठ खोडके दांपत्याच्या भूमिकेने वरिष्ठांची डोकेदुखी वाढवली आहे. विशेष म्हणजे दिलीप कडू यांनी उमेदवारी अर्जही भरला आहे. यावेळी आमदार संजय खोडके, आमदार सुलभा खोडके आणि आमदार सुधाकर आडबाले उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या आमदारांनी उमेदवार दिल्याने शिंदे गटाची चांगलीच कोंडी झाली आहे. ही जागा शिंदे गट लढवणार होता. पण त्यात राष्ट्रवादीने त्यांच्यावर कुरघोडी केली आहे.

पुणे भाजपच लढणार

दुसरीकडे पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांनी उमेदवारांच्या नावांची यादी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्याकडे दिली आहे. तीन जागांवरील 15 संभाव्य नावांची यादी नविन यांच्याकडे दिली आहे. प्रत्येक जागेसाठी 5 नावांचा पर्याय देण्यात आला आहे. 3 जागांसाठी एकूण 15 नावांची यादी सादर करण्यात आली आहे.

पुणे पदवीधर, पुणे शिक्षक आणि नागपूर पदवीधर भाजप लढणार आहे. अमरावतीची जागा शिवसेना, तर संभाजीनगर राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आहे. पुणे शिक्षक मतदारसंघावरून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरू होती. अखेर भाजपच पुणे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक भाजपच लढणार असल्यावर महायुतीचे एकमत झाले आहे.

महायुतीत फूट?

दरम्यान, महाविकास आघाडीने विधान परिषद निवडणुकीचा तिढा सोडवण्यासाठी बैठकीचं आयोजन केलं होतं. मात्र, या बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नाही. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सकाळीच मराठवाडा आणि अमरावतीच्या जागेवर दावा सांगितला आहे. त्यावर या बैठकीत चर्चा झाल्याचं सांगितलं जातंय. ही जागा आपल्याला सुटावी असा काँग्रेसचा आग्रह आहे. मात्र, ठाकरे गटाने जागा सोडली नाही तर स्वबळावर लढण्याचा इशारा दिल्याने महाविकास आघाडीतही फूट पडण्याची शक्यता आहे.

Follow Us
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर
नायरा एनर्जीचा ग्राहकांना झटका; पेट्रोल, डिझेल एवढ्या रुपयांनी महागलं
Nayara Energy : नायरा एनर्जीचा ग्राहकांना मोठा झटका; पेट्रोल, डिझेल तब्बल एवढ्या रुपयांनी महागलं
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...
Video : पुण्यात मनसेचं गुटखा माफियाविरोधात तीव्र आंदोलन
Video : पुण्यात मनसेचं गुटखा माफियाविरोधात तीव्र आंदोलन, पोलिसांच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह
बाळासाहेबांनी खोटेपणाचं राजकारण केलं नाही, पण... राम कदमांची टीका
Video : बाळासाहेबांनी खोटेपणाचं राजकारण केलं नाही, त्यांच्यानंतर मात्र..., राम कदमांची ठाकरे बंधूंवर टीका
वाल्मिक कराड गॅंगच्या सुग्रीव कराडची उमरी टोल नाक्यावर गुंडगिरी? थेट..
वाल्मिक कराड गॅंगच्या सुग्रीव कराडची उमरी टोल नाक्यावर गुंडगिरी? थेट...