मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी ‘तारीख पे तारीख’, मात्र आमदारांच्या शपथविधीची तारीख ठरली

विधीमंडळाच्या 288 सदस्यांचा शपथविधी तारीख ठरली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचा शपथविधी उद्या (6 नोव्हेंबर) होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत (Mahrashtra Winner MLA  Oath Ceremony Date) आहे.

मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी 'तारीख पे तारीख', मात्र आमदारांच्या शपथविधीची तारीख ठरली
Follow us
| Updated on: Nov 05, 2019 | 5:06 PM

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा कायम असल्याने मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या शपथविधीवर टांगती तलवार (Mahrashtra Winner MLA  Oath Ceremony Date) आहे. मात्र विधीमंडळाच्या 288 सदस्यांचा म्हणजे नव्या आमदारांच्या शपथविधीची तारीख ठरली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचा शपथविधी उद्या (6 नोव्हेंबर) होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र हा मुहूर्तही पुढे ढकलला गेल्याची सूत्रांनी सांगितले (Mahrashtra Winner MLA  Oath Ceremony Date) आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या निवडणुकीत निवडून आलेल्या 288 विधीमंडळ सदस्यांच्या शपथविधीची तारीख ठरली आहे. येत्या 13, 14 आणि 15 नोव्हेंबर रोजी विधीमंडळ सदस्यांचा शपथविधी होईल. त्यावेळी निवडून आलेले 288 आमदार शपथ घेतील.

सध्या भाजप-शिवसेनेची सत्तावाटपावरुन (BJP Shivsena Government Formation Dispute) रस्सीखेच सुरु आहे. शिवसेना मुख्यमंत्रीपदासह सत्तेतील 50-50 च्या वाट्यावर अडून बसली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री नेमका कोणाचा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी तारीख पे तारीख देण्यात येत आहे. या सरकारचा कार्यकाळ 9 नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यानंतर कारभाराची सर्व सूत्र राज्यपालांकडे जातील आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू (Mahrashtra Winner MLA  Oath Ceremony Date) होईल.

शिवसेना-भाजपमध्ये 50-50 च्या फॉर्म्युल्यावरुन फूट

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आता 13 दिवस उलटले. मात्र, सत्ता स्थापनेचा पेच अद्यापही सुटलेला नाही. लहान भाऊ-मोठा भाऊ म्हणत ज्या भाजप-शिवसेनेने एकत्रितपणे ही निवडणूक लढली, तेच आता मुख्यमंत्रिपदावर अडून बसले आहेत. त्यामुळे सत्ता स्थापना खोळंबली आहे. त्यातच आघाडीही सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करत आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपने 288 पैकी 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. मात्र कोणत्याही एका पक्षाला 145 हा सत्तास्थापनेच्या आकडा गाठता आलेलं नाही. त्यामुळे सत्ता स्थापन्यासाठी कोणत्या ना कोणत्या पक्षाचा पाठिंबा घ्यावाच लागणार आहे.

शिवसेनेला आतापर्यंत 7 अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ 56 वरुन 63 वर पोहचलं आहे, मात्र भाजपसोबत शिवसेनेचा अजूनही 36 चाच आकडा दिसत (Mahrashtra Winner MLA  Oath Ceremony Date) आहे.

भाजपला 12 अपक्षांनी पाठिंबा दर्शवल्यामुळे त्यांचं संख्याबळ 105 वरुन 117 जागांवर पोहोचलं आहे. भाजप-शिवसेना यांचं एकत्रित संख्याबळ 180 वर जातं. परंतु देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने दुखावलेल्या शिवसेनेच्या पाठीवर काँग्रेस ‘हात’ ठेवला आणि राष्ट्रवादीने ‘वेळ’ साधली, तर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार येणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

संबंधित बातम्या : 

उद्धव ठाकरे युतीच्या शिल्पकाराच्या स्मृतीस्थळी, गोपीनाथ गडावर जाऊन दर्शन घेणार

रणनीती बनवली आहे, आमदार फुटण्याचं धाडस कोणी करणार नाही : बाळासाहेब थोरात

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.