Eknath Shinde: “होय, रश्मी वहिनींचा फोन आला होता”, बंडखोर आ.दळवींच्या पत्नीनं संपूर्ण संवाद सविस्तर सांगितला…

Shivsena MLA : "होय, रश्मी वहिनींचा फोन आला होता", महेंद्र दळवींच्या पत्नीकडून खुलासा

Eknath Shinde: होय, रश्मी वहिनींचा फोन आला होता, बंडखोर आ.दळवींच्या पत्नीनं संपूर्ण संवाद सविस्तर सांगितला...
Follow us
| Updated on: Jun 28, 2022 | 1:12 PM

मुंबई : होय रश्मी वहिनींचा मला फोन आला होता. तुम्ही बंड का केलं? असं रश्मी ठाकरे म्हणाल्या असल्याचा खुलासा बंडखोर आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी (Manasi Dalavi) यांनी केला आहे. सध्या राजकीय परिस्थिती अतिशय अस्थिर आहे. शिंदेगटात सामील होऊन गुवाहाटीला गेलेले शिवसेनेचे आमदार परत येत नाहीत. तोवर महाविकास आघाडीचं अस्तित्व धोक्यात आहे. अश्यात आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) मैदानात उतरत बंडखोर आमदारांच्या पत्नींना फोन करत आपण राजकीय पक्ष म्हणून नाही तर आजवर परिवार म्हणून एकत्र होतो, इथून पुढेही राहू, असं आवाहन केलं. त्याला आता आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांनी दुजोरा दिला आहे.

मानसी दळवी काय म्हणाल्या?

होय रश्मी वहिनींचा मला फोन आला होता. तुम्ही बंड का केलं? असं रश्मी ठाकरे म्हणाल्या. पण त्यांना उत्तर देताना मी म्हणाले की, तुमच्या म्हणण्यानुसार ही बंडखोरी आहे. पण एका आमदाराची पत्नी म्हणून मी सांगेन की, त्यांनी जो निर्णय घेतला आहे, तो योग्य आहे. त्याचं मी आणि आमचं कुटुंब समर्थन करतो, असं रश्मी ठाकरेंना सांगितल्याचं मानसी दळवी यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं.

याशिवाय तुम्ही कट्टर शिवसैनिक आहात का?, प्रश्न रश्मी वहिनींनी विचारला. त्यावर मी म्हणाले की, आम्ही कालही कट्टर शिवसैनिक होतो. आजही आहोत आणि भविष्यातही शिवसैनिकच राहणार असं मी त्यांना सांगितलं. मातोश्रीवर आमचं म्हणणं ऐकण्यात आलं नाही. पण त्याचवेळी एकनाथ शिंदे आमच्यासाठी देवदूतासारखे धावून आले. आम्हाला आमदार निधी मिळवून दिला. त्यामुळे लोकांची कामं करता आली. त्यामुळेच आज आम्ही शिंदेसाहेबांच्या पाठिशी आहोत, असं रश्मी वहिनींना मी सांगितलं, असं मानसी दळवी टीव्ही 9 मराठीशी बोलताना म्हणाल्या.

Non Stop LIVE Update
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.