मोठी बातमी! रमीचा डाव भोवला, कोकाटेंचं खातं बदललं, या नेत्याकडे कृषी मंत्रिपदाची जबाबदारी
मोठी बातमी समोर येत आहे, अखेर माणिकराव कोकाटे यांचं खातं बदलण्यात आलं आहे. दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

मोठी बातमी समोर येत आहे, अखेर माणिकराव कोकाटे यांचं खातं बदलण्यात आलं आहे. दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे, तर कोकाटे यांना आता क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय देण्यात आलं आहे.
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, माणिकराव कोकाटे याचं खातं बदलण्यात आलं आहे. माणिकराव कोकाटे यांच्याकडे पूर्वी कृषी खातं होतं, मात्र आता हे खातं दत्तात्रय भरणे यांना देण्यात आलं असून, माणिकराव कोकाटे यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाचा पदभार देण्यात आला आहे.
माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा एक व्हिडीओ समोर आला होता, त्यानंतर राज्यात वातावरण चांगलंच तापलं. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ पोस्ट केला होता. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर विरोधकांकडून सातत्यानं सरकारच्या कोंडीचा प्रयत्न सुरू होता. माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू होती. माणिकराव कोकाटे यांचा मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो, अशी चर्चा सुरू होती, मात्र माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा न घेता त्यांच्याकडे असलेलं खातं बदलण्यात आलं आहे.
दरम्यान यापूर्वी देखील अनेकदा माणिकराव कोकाटे हे आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेमध्ये आले होते. त्यांनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. मात्र तेव्हा त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. मात्र त्यानंतर त्यांचा सभागृहात मोबाईलवर रम्मी खेळतानाचा व्हिडीओ समोर आला, हा व्हिडीओ समोर आल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले, कोकाटे यांच्यावर राज्यभरातून टीका झाली. यानंतर अखेर आता कोकाटे यांचं खांत बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, कोकाटे यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण खातं देण्यात आलं आहे. तर कृषी खात्यासारंख संवेदनशील खातं हे आता अजित पवार यांचे विश्वासू अशी ओळख असलेल्या दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आलं आहे. दरम्यान कोकाटे यांचा राजीनामा घेण्यात आलेला नाहीये, तर फक्त त्यांचं खात बदलण्यात आलं आहे.
