मराठा आरक्षणासाठी हर्षवर्धन पाटील पृथ्वीराज चव्हाणांच्या भेटीला, मराठा तरुणांसाठी सरकारकडे महत्वाची मागणी

हर्षवर्धन पाटील यांनी आज माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जवळपास दीड तास वेळ चर्चा झाली.

मराठा आरक्षणासाठी हर्षवर्धन पाटील पृथ्वीराज चव्हाणांच्या भेटीला, मराठा तरुणांसाठी सरकारकडे महत्वाची मागणी
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील
Follow us
| Updated on: Jun 03, 2021 | 5:45 PM

दिनकर थोरात, टीव्ही 9 मराठी, कराड : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. अशावेळी भाजपा नेते आणि मराठा आरक्षण समन्वय समितीचे सातारा जिल्हा निमंत्रक हर्षवर्धन पाटील यांनी आज माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जवळपास दीड तास वेळ चर्चा झाली. पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं मराठा आरक्षण मुंबई उच्च न्यायालयात टिकलं होतं, असं सांगत पाटील यांनी ठाकरे सरकारकडे मराठा समाजातील तरुण वर्गासाठी महत्वाची मागणी केली आहे. (Harshvardhan Patil meets Prithviraj Chavan for Maratha reservation)

मराठा आरक्षण, पद्दोन्नती आरक्षणाबाबत राज्य सरकारने तातडीने मार्ग काढावा, अन्यथा समाजा- समाजात तेढ निर्माण होवू शकतो. पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले मराठा आरक्षण मुंबई उच्च न्यायालयात टिकलं होतं. आता आरक्षणाला वेळ लागत असेल तर मराठा समाजातील मुला-मुलींच्या नोकरी आणि शैक्षणिक सुविधेसाठी काही पर्यायी व्यवस्था करता येते का हे सरकारनं तातडीने पाहावं अशी मागणी पाटील यांनी केलीय.

हर्षवर्धन पाटलांचं ठाकरे सरकारला आवाहन

मराठा आरक्षण प्रश्नी हर्षवर्धन पाटील दोन दिवसाच्या सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. ते सर्व पक्षीय मराठा नेत्यांच्या भेटी घेत आहेत. मंगळवारी त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली होती. 2014 साली पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यात थोडेफार काही बदल केले आणि ते आरक्षण मुंबई उच्च न्यायालयात टिकले. याचिकेकर्ते पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेले. दोन महिन्यापूर्वी निकाल लागला आणि मराठा आरक्षण रद्द ठरवण्यात आलं. आता आरक्षणाला वेळ लागत असेल तर मराठा समाजातील मुलामुलीच्या नोकरी आणि शैक्षणिक सुविधेसाठी काही पर्यायी व्यवस्था करता येते का? हे राज्य सरकारनं पाहावं, अशी मागणी पाटील यांनी केलीय.

उदयनराजे पुढाकार घेण्यास तयार- पाटील

पाटील यांनी मंगळवारी सातारा इथं खासदार उदयनराजे भोसले यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर पाटील समाज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी उदयनराजेंच्या भेटीबाबत विचारलं असता, आपण उदयनराजे यांची भेट घेतली. मराठा आरक्षणाबाबत समाजावर अन्याय झालेला आहे. या संदर्भात आपल्याला ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे. मराठा आरक्षणासाठी कायदेशीर आंदोलनबाबत पुढाकार घेण्यास ते तयार असल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या :

भाजप सामाजिक वाद निर्माण करून राजकीय पोळी भाजतंय, नाना पटोलेंचा घणाघात

‘मातोश्री’ने आमच्यासाठी दरवाजे बंद केले, आम्ही ‘मातोश्री’वर जाणं बंद केलं नाही – देवेंद्र फडणवीस

Harshvardhan Patil meets Prithviraj Chavan for Maratha reservation

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.