BMC Election 2022 Gundavali (Ward 82) : मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 82मध्ये काँग्रेसची अण्णागिरी चालणार?
BMC Election 2022 Gundavali (Ward 82) : 2017ची महापालिका निवडणूक जगदीश कुट्टी अण्णा यांना अत्यंत चुरशीची गेली. या चुरशीच्या लढाईत त्यांनी भाजपचे उमेदवार संतोष केळकर यांचा अवघा 48 मतांनी पराभव केला.

मुंबई: काँग्रेसचे नगरसेवक जगदीश अमीन कुट्टी (jagdish amin kutty)अर्थात अण्णा हे पुन्हा एकदा महापालिकेत येण्यासाठी सज्ज झाले आहेत. जगदीश अण्णा यांचा वॉर्ड खुला राहिल्याने त्यांना पुन्हा एकदा मैदानात उतरण्याची संधी मिळाली आहे. महापालिकेसाठीची (bmc) त्यांची ही दुसरी संधी असेल. विजयी झाले तर नगरसेवकपदाची दुसरी टर्म त्यांना उपभोगता येणार आहे. मागच्या निवडणुकीत त्यांना विजयासाठी प्रचंड कसरत करावी लागली होती. अगदी थोड्या मतांनी ते विजयी झाले होते. मात्र, यावेळी महाविकास आघाडी एकत्रित लढल्यास जगदीश अण्णा मोठ्या फरकाने विजयी होऊ शकतात. परंतु, काँग्रेसने (congress) स्वबळावर लढायचं ठरवल्यास जगदीश अण्णा यांना पुन्हा एकदा विजयासाठी संघर्ष करावा लागेल असं आकडेवारीतून तरी दिसतंय. मात्र, गेल्या पाच वर्षात त्यांनी मतदारसंघात चांगली कामे केली आहेत. लोकांशी त्यांनी दांडगा संपर्क ठेवला आहे. त्यामुळे निवडणुकीतील हे चित्रं पालटू शकतं. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीतील परिस्थिती, प्रचार, राजकीय वातावरण आणि मतदारांची तत्कालीन मनस्थिती यावर सर्व गोष्टी अवलंबून आहे. त्यामुळे वॉर्ड क्रमांक 82मध्ये पुन्हा एकदा अण्णागिरी चालते का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
फक्त 48 मतांनी विजय
2017ची महापालिका निवडणूक जगदीश कुट्टी अण्णा यांना अत्यंत चुरशीची गेली. या चुरशीच्या लढाईत त्यांनी भाजपचे उमेदवार संतोष केळकर यांचा अवघा 48 मतांनी पराभव केला. जगदीश अण्णा यांना मागच्या निवडणुकीत 5663 मते मिळाली होती. तर भाजपच्या संतोष केळकर यांना 5615 मते मिळाली होती. त्यामुळे केळकर यांचा निसटता पराभव झाला होता. मात्र, या मतदारसंघातून शिवसेनेचे माजी नगरसेवक सुभाष कांता सावंत यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला होता. शिवसेनेसाठी हा धक्का मानला जात होता. या मतदारसंघात एकूण 15 उमेदवार उभे होते. त्या सर्वांना चितपट करण्यात जगदीश अण्णा यशस्वी ठरले होते.
| पक्ष | उमेदवार (Candidate) | विजयी/आघाडी (Win/Lead) |
|---|---|---|
| शिवसेना | निधी प्रमोद शिंदे | 4,485 मतं |
| भाजप | रुक्मिणी विठ्ठल खरटमोल | 3,256 मतं |
| काँग्रेस | उषा अनिल कांबळे | 1,333 मतं |
| राष्ट्रवादी | रेशा मधुकर शिससाट | 1,716 मतं |
| मनसे | शोभा अशोक शानभाग | 1,009 मतं |
| अपक्ष/ इतर |
अशी झाली लढत
>> जगदीश कुट्टी (काँग्रेस) – 5663 >> जगदीप अरोरा (अपक्ष) – 35 >> हरबंस सिंग (अपक्ष) – 373 >> संजय धावारे ( मनसे) – 369 >> भीमराव गमरे (अपक्ष) – 1227 >> प्रकाश गमरे (पीपल्स रिपब्लिकन पार्टी) – 52 >> रामनिवास गुप्ता (बहुजन मुक्ती पार्टी) -179 >> संतोष केळकर (भाजप) – 5615 >> अनिलकुमार मिश्रा (अपक्ष) – 58 >> राजा नाडार (अपक्ष) – 138 >> नरेश सैनी (अपक्ष) – 137 >> सुभाष कांता सावंत (शिवसेना) – 3724 >> राजमनी शुक्ला (राष्ट्रवादी) – 1317 >> सय्यैद अमीन (भाकप) – 185 >> ओमप्रकाश विश्वकर्मा (अपक्ष) – 60 >> नोटा – 185
असा आहे वॉर्ड
वॉर्ड क्रमांक 82 मध्ये जे. बी. नगर, अशोक नगर, रामलिला मैदान, तेली गल्ली परिसर, गुंदवली, विमा नगर, साई नगर आणि एएआय कॉलनीचा समावेश होतो.
लोकसंख्येपेक्षा मतदान कमी
या मतदारसंघाची लोकसंख्या 45 हजार 321 एवढी आहे. यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 753 आहे. तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 341 आहे. तर या निवडणुकीत 19 हजार 317 मतदारांनी भाग घेतला होता.
