पिंजऱ्यात बसून असलेल्यांना सर्टिफिकेट कसं देणार?; नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

आम्ही हिंदुत्ववादी आहोत. आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही, असं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. त्याचा माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी जोरदार समाचार घेतला आहे. (narayan rane taunt cm uddhav thackeray over hindutva)

पिंजऱ्यात बसून असलेल्यांना सर्टिफिकेट कसं देणार?; नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
Follow us
| Updated on: Nov 18, 2020 | 12:31 PM

मुंबई: आम्ही हिंदुत्ववादी आहोत. आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही, असं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. त्याचा माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी जोरदार समाचार घेतला आहे. मुख्यमंत्री कोणत्याच परीक्षेला बसले नाहीत. पिंजऱ्यात बसून आहेत. त्यांनी कामच केलं नाही. मग सर्टिफिकेट कसं देणार?, असा टोला नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. (narayan rane taunt cm uddhav thackeray over hindutva)

पालघर हत्याकांडप्रकरण सीबीआयकडे सोपविण्याच्या मागणीसाठी भाजप नेते राम कदम यांनी जनआक्रोश रॅलीचं आयोजन केलं होतं. याप्रसंगी नारायण राणेही उपस्थित होते. यावेळी त्यांनी हा टोला लगावला. राज्यातील विकास कामे ठप्प आहेत. मुख्यमंत्री झाल्यापासून उद्धव ठाकरे यांनी एकही काम केलं नाही. घरातच बसून असतात. पिंजऱ्यातून बाहेर पडत नाहीत. ठाकरे कोणत्याही परीक्षेला बसले नाहीत. बसत नाहीत. त्यामुळे त्यांना सर्टिफिकेट देण्याची गरज नाही, असा टोला राणे यांनी लगावला.

राज्यात तीन पक्षाचं सरकार आहे. हे तिन्ही पक्ष हिंदूविरोधी आहेत असं म्हणणार नाही. पण शिवसेना हिंदुत्ववादी राहिली नाही. शिवसेनेला मी हिंदुत्ववादी म्हणणार नाही. हे तर तडजोडवादी आहेत. गद्दारी करून शिवसेना सत्तेत आली. पदासाठी त्यांनी तडजोड केली, अशी टीकाही त्यांनी केली. कोरोना काळात अशा प्रकारचं आंदोलन करू नका अशी विनंती पोलिसांनी राम कदम यांना केली होती. त्यामुळे कदम यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, असं सांगतानाच पालघर प्रकरणी राज्य सरकारने पाहिजे तशी चौकशी केली नाही. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे द्यावे अशी आमची मागणी आहे. त्यासाठीच हे आंदोलन करण्यात आलं आहे, असं राणे म्हणाले.

झोपलेलं सरकार

राम कदम यांनीही जोपर्यंत पालघर हत्याकांडाचं प्रकरण सीबीआयकडे चौकशीसाठी सोपवलं जात नाही तोपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही, असं स्पष्ट केलं. आज या संघर्षाची ठिणगी पडली आहे. आता संघर्षाचा वणवा पेटेल, असा इशाराही त्यांनी दिला. या सरकारला साधूंचा आक्रोश ऐकू येत नाही. आम्हाला हा आक्रोश ऐकू येतोय. म्हणूनच ज्या ठिकाणी साधूंची हत्या झाली. त्या ठिकाणी दिवा पेटवून या साधूंना श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही जात होतो. तरीही आम्हाला मज्जाव करण्यात आला. दिवा पेटवणं हा काही गुन्हा आहे का?, असा सवाल करतानाच 212 दिवस झाले तरी सरकार या प्रकरणाचा न्याय करू शकली नाही. पोलीसही सरकारच्या दबावात आहेत. त्यामुळेच हे प्रकरण हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात यावे, अशी मागणी कदम यांनी केली. आज संघर्ष सुरू झाला. आता रस्त्यावरचा संघर्ष करू. आम्ही थांबणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. (narayan rane taunt cm uddhav thackeray over hindutva)

दरम्यान, पालघर जिल्ह्यातील गडचिंचले हत्याकांडात मारलेल्या साधूच्या नावाने दिवा लावण्यासाठी जमलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. गडचिंचले येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी आमदार राम कदम आले असता पोलिसांनी त्यांना पालघरमध्ये येण्यास मज्जाव केला. त्यामुळे मनोर येथे भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते जमा झाले होते. पोलिसांनी यावेळी दहा ते पंधरा जणांना ताब्यात घेतले होते.

संबंधित बातम्या:

पालघर हत्याकांडाची सीबीआय चौकशी करा; नारायण राणे यांची मागणी

पालघर मॉब लिंचिंगप्रकरणी राम कदम यांचे जनआक्रोश आंदोलन, आंदोलनापूर्वी पोलिसांच्या ताब्यात

(narayan rane taunt cm uddhav thackeray over hindutva)

Non Stop LIVE Update
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.