मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारा राष्ट्रवादीचा आमदारही भाजपच्या वाटेवर

राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) बसणारे राजकीय धक्के थांबवण्याचं नाव घेताना दिसत नाही. राज्यभरातून एकामागून एक नेता राष्ट्रवादीला रामराम करत सत्ताधारी पक्षात जात आहे. आता नव्याने एक नाव समोर येत आहे.

मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारा राष्ट्रवादीचा आमदारही भाजपच्या वाटेवर

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) बसणारे राजकीय धक्के थांबवण्याचं नाव घेताना दिसत नाही. राज्यभरातून एकामागून एक नेता राष्ट्रवादीला रामराम करत सत्ताधारी पक्षात जात आहे. आता नव्याने एक नाव समोर येत आहे. राष्ट्रवादीचे वैजापूरचे (Vaijapur Constituency) आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर (Bhausaheb Patil Chakatgaonkar) हे देखील भाजपमध्ये (BJP) प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्या पक्ष बदलामागे त्यांचे व्याही भाजप खासदार प्रतापराव पाटील चिकटगावकर (Prataprao Patil Chikatgaonkar) असल्याचं बोललं जात आहे. त्यांच्या माध्यमातून येत्या 2 दिवसात भाऊसाहेब चिकटगावकर भाजप प्रवेश करतील, असं बोललं जात आहे.

दरम्यान, शिवस्वराज्य यात्रा ज्या जिल्ह्यात जाईल, तेथील स्थानिक आमदार, खासदार आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होतील, असं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं होतं. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा औरंगाबाद जिल्ह्यात आली तेव्हा औरंगाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती. तेव्हापासून भाऊसाहेब चिकटगावकर पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे चिकटगावकर आता कोणता निर्णय घेतात याकडे अनेकांचं लक्ष लागून आहे.

चिकटगावकरांकडून मराठा आरक्षणासाठी आमदारकीचा राजीनामा

Bhausaheb Chikatgaonkar MLA resignation letter

विशेष म्हणजे भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी मराठा आरक्षणासाठी त्यांनी आपल्या आमदारकीचाही राजीनामा दिला होता.  वैजापूर मतदारसंघातील काकासाहेब शिंदे या तरुणाने पाण्यात उडी घेऊन जलसमाधी घेतली होती. त्यानंतर चिकटगावकर यांनी जुलै 2018 रोजी मराठा समाजाचा स्वाभिमान लक्षात घेऊन विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं पत्र विधानसभा अध्यक्षांना दिलं होतं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *