राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळल्यावर संजय राऊतांची पत्रकार परिषद लाईव्ह

Sanjay Raut on Election Commission Decision about NCP Symbol and Name Ajit Pawar : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला दिलं. त्यानंतर खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. तसंच अजित पवारांवर टीकास्त्र डागलं.

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळल्यावर संजय राऊतांची पत्रकार परिषद लाईव्ह
Follow us
| Updated on: Feb 07, 2024 | 11:02 AM

संदिप राजगोळकर, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली | 07 फेब्रुवारी 2024 : राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगाचा काल निर्णय आला. अजित पवार गट हाच राष्ट्रवादी पक्ष आहे आणि घड्याळ चिन्हही अजित पवार गटकडेच राहील, असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला. त्यानंतर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या निर्णयावर भाष्य केलं. राष्ट्रवादी पक्ष शरद पवार यांनी स्थापन केला आहे. त्याचे कर्ते- धरते, संस्थापक हे शरद पवार आहेत.आता हे लोक आयोगासमोर जाऊन बसले आणि सांगितल की मी पक्ष स्थापन केला… याला काय म्हणावं?, असं संजय राऊत म्हणाले.

‘ही’ मोदी गॅरंटी- राऊत

निवडणूक आयोग पक्ष आयऱ्या गैऱ्याच्या हाती देत आहे. जो अन्याय शिवसेनेच्या बाबत झाला तोच शरद पवार यांच्या बाबत झाला, याला मोदी गॅरंटी म्हणतात… ED, CBI लावून तुम्हाला पक्ष फोडायला लावला. नॅशनल करप्त पार्टी ज्यांना भाजप म्हणाले तो पक्ष अजित पवार यांना दिला. मोदी शाह या दोन नेत्यांचा महाराष्ट्रावर राग आहे. त्यांना बदला घ्यायचं आहे हे आता सिद्ध झालं आहे. महाराष्ट्राचा सूड घेतला आहे हे दिसून आलं. पण जिथे ठाकरे तिथं शिवसेना… आणि जिथं शरद पवार तिथं राष्ट्रवादी…, असं संजय राऊत म्हणाले.

“महाविकास आघाडीच्या नेत्यांचे दौरे लवकरच”

शरद पवार खंबीर आहेत. लवकरच महाविकास आघाडीचे नेत्यांचे संयुक्त दौरे राज्यात होतील. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची काल फोनवर सविस्तर चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांनी त्यांचे अनुभव सविस्तर त्यांना सांगितला. आम्ही सगळे एकत्र ठामपणे उभे आहोत. या अन्यायाविरोधात लढण्याासाठी आम्ही तयार आहोत. लोकच आता या लोकांना धडा शिकवतील, असं संजय राऊत म्हणाले.

संभाजीराजे नॉट रिचेबल, राऊत म्हणाले…

माजी खासदार, स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती मागच्या 5 दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. ते नेमके कुठे आहेत? याची कुटुंबियांना देखील माहिती नाहीये. अशात महाविकास आघाडीकडून संभाजीराजे यांचे वडील शाहू महाराज छत्रपती यांच्या नावाची चर्चा आहे. यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नॉट रीचेबाल आहेत हे मला माहीत नाही. आमची त्यांच्याशी चर्चा झाली नाही. पण आमचं मत आहे की, श्रीमंत शाहू छत्रपती यांना राज्यसभेवर बिनविरोध पाठवावं. आमच्याकडे काही मते आहेत त्यामुळं त्यांना राज्यसभेवर पाठवाव अस मला वाटतं, असं संजय राऊत म्हणाले.

Non Stop LIVE Update
मराठा तरूणांसाठी दिलासा, MPSC पदभरतीत जागांची वाढ नवी जाहिरात प्रसिद्
मराठा तरूणांसाठी दिलासा, MPSC पदभरतीत जागांची वाढ नवी जाहिरात प्रसिद्.
दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल, तिघे निर्दोष तर किती आरोपींना जन्मठेप?
दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल, तिघे निर्दोष तर किती आरोपींना जन्मठेप?.
गद्दारी, दावोसचा दौरा अन गुलाबी थंडी; चतुर्वेदी- शिंदे गटात वार-पलटवार
गद्दारी, दावोसचा दौरा अन गुलाबी थंडी; चतुर्वेदी- शिंदे गटात वार-पलटवार.
कमळाऐवजी तुतारीच्या प्रचार, छगन भुजबळांवर शिंदेच्या आमदाराचा आरोप काय?
कमळाऐवजी तुतारीच्या प्रचार, छगन भुजबळांवर शिंदेच्या आमदाराचा आरोप काय?.
मतदानाचे 2 टप्पे बाकी अन् पवारांनी किती जागा जिंकणार केलं थेट भाकित
मतदानाचे 2 टप्पे बाकी अन् पवारांनी किती जागा जिंकणार केलं थेट भाकित.
'लोकसभा असो की विधानसभा विकलेला माल परत नाही', अंधारेंचा रोख कुणावर
'लोकसभा असो की विधानसभा विकलेला माल परत नाही', अंधारेंचा रोख कुणावर.
... म्हणून मला संधी नाही; अजित दादांच्या वक्तव्यावरून कुणाचा खोचक टोला
... म्हणून मला संधी नाही; अजित दादांच्या वक्तव्यावरून कुणाचा खोचक टोला.
भुजबळ तुतारीचा प्रचार करताय, शिवसेना आमदाराच्या वक्तव्यावर म्हणाले...
भुजबळ तुतारीचा प्रचार करताय, शिवसेना आमदाराच्या वक्तव्यावर म्हणाले....
पदवीधर मतदारसंघ निवडणूक जाहीर, ठाकरे आणि शिंदे गटाकडून ही नावं आघाडीवर
पदवीधर मतदारसंघ निवडणूक जाहीर, ठाकरे आणि शिंदे गटाकडून ही नावं आघाडीवर.
काँग्रेससोबत जाऊन ठाकरेंची गद्दारी, आदित्यच्या कपाळावर हवं मेरा बाप...
काँग्रेससोबत जाऊन ठाकरेंची गद्दारी, आदित्यच्या कपाळावर हवं मेरा बाप....