नितीन राऊतांचा बंगला एका दिवसात बदलला, थोरात मात्र प्रतीक्षेतच

नितीन राऊतांना 24 तासांत पुन्हा नवीन जीआर काढत 'चित्रकूट'ऐवजी 'पर्णकुटी' या शासकीय बंगल्याचं वाटप करण्यात आलं

नितीन राऊतांचा बंगला एका दिवसात बदलला, थोरात मात्र प्रतीक्षेतच

मुंबई : खातेवाटपापूर्वीच शासकीय बंगलेवाटप करुनही मंत्र्यांमध्ये रंगलेलं मानापमान नाट्य अजूनही सुरुच आहे. काँग्रेस नेते डॉ. नितीन राऊत यांना दिलेला बंगला 24 तासात बदलून (Nitin Raut Bungalow Changed) देण्यात आला आहे. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात मात्र अद्यापही बंगल्याच्या प्रतीक्षेत आहेत.

कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांना आधी ‘चित्रकूट’ बंगला देण्यात आला होता. मात्र 24 तासांत पुन्हा नवीन जीआर काढत  राऊत यांना ‘चित्रकूट’ऐवजी ‘पर्णकुटी’ या शासकीय बंगल्याचं वाटप करण्यात आलं आहे. राऊत यांना आधी दिलेला ‘चित्रकूट’ बंगला हा आता विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना आता देण्यात आला आहे.

चित्रकूट बंगल्यावरून नितीन राऊत नाराज असल्याचं म्हटलं जात होतं. त्यामुळे 24 तासात पुन्हा नवीन ऑर्डर काढत नवीन बंगला दिल्याची चर्चा आहे. हे दोन्ही बंगले मलबार हिल परिसरातच आहेत. दुसरीकडे बाळासाहेब थोरात अजूनही शासकीय बंगल्याच्या प्रतिक्षेतच आहेत.

कोणाला कोणता बंगला?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ‘वर्षा’ बंगला मिळाला आहे. छगन भुजबळ यांना ‘रामटेक’, जयंत पाटील यांना ‘सेवासदन’ आणि एकनाथ शिंदे यांना ‘रॉयलस्टोन’ हे बंगले मिळाले आहेत.

सरकारी निवासस्थानामध्ये अर्थातच सर्वाधिक चर्चेचा बंगला म्हणजे मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला होय. वर्षा बंगल्यावर मंत्र्यांची रेलचेल, बैठकी, नियोजन, चर्चा हे सर्व घडत असतं. मात्र ‘वर्षा’शिवाय दुसरा चर्चेत असलेला बंगला म्हणजे रामटेक (ramtek bungalow) होय.

‘नकोसा’ रामटेक भुजबळांच्या वाट्याला, मंत्र्यांना सरकारी बंगल्यांचं वाटप!

रामटेक या बंगल्याबाबत अनेक अंधश्रद्धा आहेत. छगन भुजबळ हे आघाडी सरकारच्या काळात याच बंगल्यात वास्तव्यास होते. 1999 च्या सुमारास भुजबळ या बंगल्यात आले. मात्र त्यांच्यावर तेलगी प्रकरणी आरोप झाल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.  याशिवाय फडणवीस सरकार आल्यानंतर त्यांना तुरुंगवास झाला.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता विरोधी पक्षनेते झाले आहेत. त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेत्याचा बंगला मिळाला आहे. देवेंद्र फडणवीस यांना सागर हा बंगला मंजूर झाला आहे.

Nitin Raut Bungalow Changed

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *