शहिद पंतप्रधानाच्या मुलाला… राहुल गांधी यांच्या निलंबनावरून प्रियंका गांधी यांच्या संतापाचा कडेलोट

देशात भाजपचे राज्य आल्यांनतर त्यांच्या चुकीच्या धोरणांवर राहुल गांधी सातत्याने टीका करत आहेत. तसेच, नुकतीच त्यांनी भारत जोडो यात्रा काढली होती. या यात्रेला लोकांनी मोठा प्रतिसाद दिला होता.

शहिद पंतप्रधानाच्या मुलाला... राहुल गांधी यांच्या निलंबनावरून प्रियंका गांधी यांच्या संतापाचा कडेलोट
PM NARENDRA MODI AND RAHUL GANDHIImage Credit source: TV9 NETWORK
Follow us
| Updated on: Mar 24, 2023 | 7:55 PM

मुंबई : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांना गुजरातमधील सूरत न्यायालयाने दोन वर्षांची सजा सुनावली आहे. मोदी आडनावाचे सगळेच चोर का असतात? अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. त्यावरून दाखल झालेल्या गुन्ह्यात राहुल गांधी यांना न्यायालयाने ही सजा सुनावली. त्यांनतर लोकसभेचे सचिव उत्पल कुमार सिंग यांनी न्यायालयाच्या या निर्णयाची दखल घेत राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय जारी केला. यामुळे राहुल गांधी यांची बहीण आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी – वड्रा संतापल्या आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरवर टॅग करत आपला संताप व्यक्त केला आहे.

राहुल गांधी हे केरळच्या वायनाड मतदारसंघातून निवडून आले आहेत. देशात भाजपचे राज्य आल्यांनतर त्यांच्या चुकीच्या धोरणांवर राहुल गांधी सातत्याने टीका करत आहेत. तसेच, नुकतीच त्यांनी भारत जोडो यात्रा काढली होती. या यात्रेला लोकांनी मोठा प्रतिसाद दिला होता. मात्र, सुरत न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी – वड्रा यांनी यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी यांनी सच्च्या देशभक्ताप्रमाणे अदानी याने केलेल्या लूटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांच्यावर प्रश्न उपस्थित केला. तुमचे मित्र अदानी हे देशाची जनता आणि संसदेपेक्षा मोठे झाले का ? अदानी यांच्याकडून करण्यात येत असलेल्या लुटीबाबत प्रश्न विचारला म्हणून तुम्ही बावचळले का ? अशी टीका प्रियंका गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.

नेहरू’ नाम क्यों नही रखते

काश्मीरी पंडितांच्या रितीरिवाजानुसार एका मुलाने वडिलांच्या मृत्यूनंतर पगडी परिधान केली. आपली परंपरा जपली. संसदेमध्ये आपण गांधी परिवार, काश्मिरी पंडित समाजाचा अपमान केला. वह ‘नेहरू’ नाम क्यों नही रखते असे म्हणालात. त्यावेळी तुम्हाला संसदेने का अपात्र ठरविले नाही अशी विचारणा त्यांनी केली आहे.

शहीद पंतप्रधानाच्या मुलाला देशद्रोही

नरेंद्र मोदीजी तुम्ही आमच्यावर घराणेशाहीचा आरोप करता. पण, याच घराण्याने भारतातील लोकशाहीसाठी आपले रक्त सांडले. तुमच्या एका चमच्याने एका शहीद पंतप्रधानाच्या मुलाला देशद्रोही, मीर जाफर संबोधले. तर, तुमच्या एका मुख्यमंत्र्याने थेट राहुल गांधी यांचे वडील कोण ? असा प्रश्न उपस्थित केला. मग, त्यांना कोणता न्याय लावणार असा सवालही त्यांनी नरेंद्र मोदी यांना केला आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.