AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवडणुकीतून माघार घेतली चांगली गोष्ट; तसाही आमचा विजय…, भाजपाच्या निर्णयावर दानवेंची प्रतिक्रिया

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपाच्या निवडणुकीतून माघार घेण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाने महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसा निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

निवडणुकीतून माघार घेतली चांगली गोष्ट; तसाही आमचा विजय..., भाजपाच्या निर्णयावर दानवेंची प्रतिक्रिया
Image Credit source: tv 9
| Updated on: Oct 17, 2022 | 3:49 PM
Share

औरंगाबाद :  अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीवरून वातावरण चांगलंच तापलं होतं. भाजपाकडून (BJP) मुरजी पटेल यांना उमदेवारी देण्यात आली होती. तर शिवसेना (Shiv sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके या रिंगणात आहेत. भाजपाने आज अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली. भाजपाच्या या निर्णयावर समिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी देखील भाजपाच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देताना भाजपाने महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे.

नेमकं काय म्हटलं दानवे यांनी?

दानवे यांनी भाजपाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. भाजपाने महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसा निर्णय घेतल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. भलेही ते आमच्या विरोधात असतील मात्र त्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसा निर्णय घेतला आहे. आमच्या भगिनी ऋतुजा लटके या अंधेरी पूर्वमधून उभ्या आहेत. त्या कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडून येणार याची आम्हाला खात्री होती.

रमेश लटके यांच निधन दुर्दैवी आहे. ते शिवसेनेचे सच्चे कार्यकर्ते होते. शाखाप्रमुखापासून ते आमदारापर्यंत पोहोचले. ते या परिसरात 24 तास शिवसेनेचं कार्य करत होते. त्यामुळे अंधेरीमध्ये आमची ताकद आहे. आम्ही निश्चित निवडून येणारच होतो. मात्र भाजपाने माघार घेतली हा चांगला निर्णय असल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे.

राणे यांच्यावर बोलणे टाळले

दरम्यान दुसरीकडे नारायण राणे यांच्याकडून सातत्याने ठाकरे गटावर टीका सुरू आहे. याबाबत दानवे यांना विचारले असता त्यांनी राणेंवर बोलणे टाळले. राणेंवर बोलण्याची गरज नसल्याचं दानवे यावेळी म्हणाले.

Follow Us
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
Ganpati Bappa Morya | मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजीरवाडी मंडळात दर्शन
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...