आजपासून 90 दिवसांनी निवडणुका : प्रकाश जावडेकर

आजपासून 90 दिवसांनी निवडणुका : प्रकाश जावडेकर

पुणे : देशात सध्या निवडणुकीचं वारं वाहू लागलं आहे. काही दिवसांवर लोकसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे सगळ्याच पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवण्यास सुरुवात केली आहे. यातच आता केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी भाकित वर्तवलं आहे की, आजपासून 90 दिवसांनी देशात लोकसभेच्या निवडणुका होतील. ते पुण्यात बोलत होते.

जावडेकर निवडणुकीबद्दल नेमकं काय म्हणाले?

आजपासून 90 दिवसांनी देशात लोकसभेच्या निवडणुका होतील. आजपासून 90 दिवसांनी पुण्यात मतदान झाले असेल, तर देशात काही ठिकाणी मतदान सुरु असेल, असे भाकित प्रकाश जावडेकर यांनी वर्तवले आहे.

यावेळी प्रकाश जावडेकर यांनी पुण्यातील हेल्मेटसक्तीला पाठिंबा दिला. ते म्हणले, “दिल्लीत सर्व हेल्मेट घालतात. देशभर अनेक शहरांमध्ये हेल्मेट घालतात.” आपलं राजकीय वजन ज्या पुण्यात आहे, त्या पुण्यात हेल्मेटसक्तीला मोठा विरोध होत असताना, जावडेकरांनी अप्रत्यक्षरित्या समर्थन दिलं असताना, आता पुणेकर काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

जावडेकरांची काँग्रेसवर टीका

“जेवढे पण घोटाळे झालेत, ते काँग्रेसच्या काळात झाले आहेत. 56 वर्षात काँग्रेसने गरिबांचा विचार नाही केला आणि आम्हाला 56 दिवसांचा हिशोब विचारत आहेत. शेतकऱ्यांना पहिल्यांदा न्याय मिळाला आहे.” असे म्हणत प्रकाश जावडेकरांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

राममंदिर नक्कीच होणार, कारण जमिनीखाली राममंदिराचा ढाचा होता, असेही प्रकाश जावडेकर यावेळी म्हणाले.

“मेरा घर बीजेपी का घर”, ज्यांना भाजपला मतदान करायचे आहे ते घरावर भाजपचा झेंडा लावतील, असा कार्यक्रम भाजप हाती घेणार असल्याची माहितीही यावेळी प्रकाश जावडेकर यांनी दिली.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI