राज्य सरकारने भ्रष्टाचाराचे सगळे विक्रम मोडले, विखे-पाटलांचा ठाकरे सरकारवर घणाघात

आघाडी सरकारवर लक्ष्मी रूसलीय की प्रसन्न आहे, माहीत नाही. मात्र, हे स्वतःलाच लक्ष्मीकरता प्रसन्न करून घेत आहेत. आज राज्यातील सामान्य नागरिक, शेतकरी अडचणीत आहेत. पण महसूल गोळा करण्यात मंत्र्यांचा वेळ चाललाय. शेतकरी उपाशी आणि मंत्री तुपाशी अशी अवस्था झाली असल्याचा घणाघात विखे-पाटलांनी केलाय.

राज्य सरकारने भ्रष्टाचाराचे सगळे विक्रम मोडले, विखे-पाटलांचा ठाकरे सरकारवर घणाघात
राधाकृष्ण विखे-पाटील, बाळासाहेब थोरात, उद्धव ठाकरे


शिर्डी : भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर जोरदार टीका केलीय. राज्यातील सामान्य नागरिक आणि शेतकरी अडचणीत आहेत. अशावेळी आघाडी सरकारचे मंत्री मात्र स्वतःला लक्ष्मीकरता प्रसन्न करून घेत आहेत. राज्यातील जनता उपाशी आणि मंत्री तुपाशी असल्याची टीका भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलीय. (Radhakrishna Vikhe Patil’s criticism of Mahavikas Aghadi government and Balasaheb Thorat)

माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज लोणी प्रवरानगर येथील प्रवरा शिक्षण संस्था आणि साखर कारखान्यात सपत्निक लक्ष्मीपूजन केले. आघाडी सरकारवर लक्ष्मी रूसलीय की प्रसन्न आहे, माहीत नाही. मात्र, हे स्वतःलाच लक्ष्मीकरता प्रसन्न करून घेत आहेत. आज राज्यातील सामान्य नागरिक, शेतकरी अडचणीत आहेत. पण महसूल गोळा करण्यात मंत्र्यांचा वेळ चाललाय. शेतकरी उपाशी आणि मंत्री तुपाशी अशी अवस्था झाली असल्याचा घणाघात विखे-पाटलांनी केलाय.

विखे-पाटलांचा थोरातांनाही खोचक टोला

केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलचे दर अनुक्रमे 5 आणि 10 रुपयांनी कमी केले आहेत. मात्र, यावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी टिका केली होती. यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी थोरातांचा समाचार घेतलाय. महसूल मंत्र्यांचा अभ्यास कमी पडतोय. केंद्राने जीएसटी थकवला ही वस्तुस्थिती नसून राज्यातील मंत्र्यांचा केंद्राकडे बोट दाखवण्याचा एकमेव कार्यक्रम सुरू आहे. आपल्या दिव्याखाली अंधार आहे ना? राज्यातील मंत्र्यांनी भ्रष्टाचारातून थोडं बाजूला येवून जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं, असा खोचक टोला विखे पाटील यांनी थोरातांना लगावलाय.

‘भ्रष्टाचाराचा सगळा उच्चांक महाविकास आघाडीने मोडला’

राज्य सरकारने कोविडमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना मदत केली नाही. लसीकरणातही संधी होती, मात्र, राज्यानं केवळ पाहण्याची भूमिका पार पाडली. राज्य सरकार सगळ्याच पातळीवर अपयशी ठरलं असून केवळ दिवसागणिक भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येत आहेत. भ्रष्टाचाराचा सगळा उच्चांक महाविकास आघाडीने मोडला असल्याची टीकाही विखे-पाटील यांनी केलीय.

हिवाळी अधिवेशनात भांडाफोड, विखे-पाटलांचा इशारा

यापूर्वी थोरातांचं थेटपणे नाव न घेता नगरच्या मंत्र्याचा पापाचा घडा भरलाय, असं विखे पाटील म्हणाले होते. त्यानंतर आता कोणत्या दूध संघाने किती पैसे लाटले याचा भांडाफोड हिवाळी अधिवेशनात करणार असल्याचा इशाराच विखे-पाटील यांनी 31 ऑक्टोबररोजी दिला होता.

मागच्या सरकारने दुधाला प्रतिलीटर पाच रुपये अनुदान दिलं. मात्र, शेतकऱ्यांना अनुदान न देता दूध संघाने ते पैसे हडप केले. कोणत्या दूध संधानं किती पैसे लाटले याचा भांडाफोड हिवाळी अधिवेशनात करणार असल्याचा इशारा विखे-पाटील यांनी बाळासाहेब थोरातांना दिलाय. विखे-पाटील म्हणाले की, संगरनेरमधील एका सहकारी दूध संघाने वर्षभर दुधाचे पैसे कापले. अन तेच पैसे रिबीट म्हणून देण्यात आले. शेतकऱ्यांचेच पैसे शेतकऱ्यांना दिले. तेश शेतकरी आता आंदोलन करणार आहेत.

इतर बातम्या :

‘अन्यथा या सर्व विद्यार्थ्यांना संघटित करुन सरकार विरोधात आंदोलन करू’, सदाभाऊ खोतांचा राज्य सरकारला इशारा

एसटी कामगारांना नोकरीवरून काढू नका, नाही तर…; राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्रं

Radhakrishna Vikhe Patil’s criticism of Mahavikas Aghadi government and Balasaheb Thorat

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI