AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यसभा निवडणुकीत मत बाद, सुहास कांदे यांची उच्च न्यायालयात धाव, 15 जूनला होणार सुनावणी

राज्यसभा निवडणुकीत शिवसेना आमदार सुहास कांदे यांचं मत बाद करण्यात आलं. त्यानंतर कांदे यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली.

राज्यसभा निवडणुकीत मत बाद, सुहास कांदे यांची उच्च न्यायालयात धाव, 15 जूनला होणार सुनावणी
| Updated on: Jun 13, 2022 | 1:43 PM
Share

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत शिवसेना आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांचं मत बाद करण्यात आलं. त्यानंतर कांदे यांनी मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) याचिका दाखल केली.मतदान रद्द केल्याप्रकरणी याचिका दाखल करत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला त्यांनी आव्हान दिलं आहे. “निवडणूक आयोगाने माझी बाजू न ऐकताच निर्णय दिला आहे. तो मला मान्य नाही.माझी बाजू ऐकुन घेतली पाहिजे होती. तस केलं नाही. आयोगाच्या या निर्णयामुळे माझी प्रतिमा मलिन झाली.म्हणून मी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर 15 जूनला मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे”, असं मत सुहास कांदे यांनी व्यक्त केलं. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

सुहास कांदे यांची न्यायालयात याचिका

राज्यसभा निवडणुकीत शिवसेना आमदार सुहास कांदे यांचं मत बाद करण्यात आलं. त्यानंतर कांदे यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली.मतदान रद्द केल्याप्रकरणी याचिका दाखल करत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला त्यांनी आव्हान दिलं आहे.

कांदे काय म्हणाले?

“निवडणूक आयोगाने माझी बाजू न ऐकताच निर्णय दिला आहे. तो मला मान्य नाही.माझी बाजू ऐकुन घेतली पाहिजे होती. तस केलं नाही. आयोगाच्या या निर्णयामुळे माझी प्रतिमा मलिन झाली.म्हणून मी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर 15 जूनला मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे”, असं मत सुहास कांदे यांनी म्हटलंय.

सुहास कांदेंवरचं मत बाद

राज्यसभा निवडणुकीत एक-एक मतासाठी दोन्हीबाजूने रस्सीखेच सुरू असताना मविआच्या तीन मतांवर आक्षेप घेण्यात आला. यशोमती ठाकूर, जितेंद्र आव्हाड, सुहास कांदे यांच्या मतावर आक्षेप घेण्यात आला. अखेर कांदे यांचं मत बाद ठरवण्यात आलं. त्याचवेळी मंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यायायलात जाणार असल्याचं बोलून दाखवलं होतं.

सुहास कांदेंवरचा नेमका आक्षेप काय?

मतदारानं मतप्रत्रिकेची घडी घालणं गरजेचं असतं, पण कांदेंनी मतपत्रिकेची घडी घातली नाही. सुहास कांदेंनी आपल्या पक्षाच्या प्रतिनिधीला मतदान कक्षाच्या बाहेरुन मतपत्रिका दाखवली. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना मतदान कक्षात जाण्यास सांगितलं.

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.