Pune Rave Party: सुनावणीनंतर बाहेर पडताना रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाल्या? वाचा…
पुणे पोलिसांनी खराडी भागातील रेव्ह पार्टीतून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक केली होती. या प्रकरणाच्या सुनावणीनंतर रोहिणी खडसे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

पुणे पोलिसांनी खराडी भागात छापेमारी करून रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला होता. या पार्टीतून नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आज या प्रकरणाची सुनावणी पुणे जिल्हा सत्र न्यायालयात पार पडली. या सुनावणीला एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे वकीली कोट घालून हजर होत्या. सुनावणी संपल्यानंतर कोर्टातून बाहेर पडताना त्यांनी महत्वाचे विधान केले आहे.
रोहिणी खडसे काय म्हणाल्या?
प्रांजल खेवलकर यांना अटक झाल्यानंतर आज रेव्ह पार्टी प्रकरणावर कोर्टात सुनावणी पार पडली. ही सुनावणी संपल्यानंतर बाहेर पडताना रोहिणी खडसे यांनी माध्यमांनी सुनावणीबाबत प्रश्न विचारले. मात्र यावेळी बोलताना रोहिणी खडसे यांनी, ‘हा सगळा विषय न्यायप्रविष्ट आहे. यावर योग्य वेळी मी माझी संपूर्ण भूमिका मांडणार आहे.’ असं विधान केलं आहे.
पुण्यातील खराडी येथील रेव्हा पार्टी प्रकरणी प्रांजवल खेवलकर यांच्यासह इतर सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सोपवण्यात आली होती. ही कोठडी आता संपली आहे. त्यामुळे आज या सर्व आरोपींना पुणे न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी रोहिणी खडसे न्यायालयात आल्या होत्या. खडसे यांनी कायद्याचे शिक्षण घेतलेले आहे. त्या खुद्द एक वकील आहेत. त्यामुळे रोहिणी खडसे आज न्यायालयात वकिलीचा कोट घालून दिसल्या.
रोहिणी खडसेंनी आधी घेतली होती पुणे पोलिसांची भेट
पतीच्या अटकेनंतर आज रोहिणी खडसे यांनी सोमवारी पुणे पोलिसांची भेट घेतली होती. रात्री 8 वाजता रोहिणी खडसे पुणे पोलिस आयुक्तालयात गेल्या होत्या. यावेळी त्या पुणे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटल्या. प्रांजल खेवलकर यांना अटक केल्यानंतर त्यांच्यावर कोणते गुन्हे दाखल झाले आहेत याची माहिती रोहिणी खडसे यांनी पोलिसांकडून घेतली होती.
प्रांजल खेवलकर कोण आहेत?
एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर हे एक व्यावसायिक आहेत आणि त्यांचे रिअल इस्टेट, इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये काम आहे. त्याच्या काही कंपन्या देखील आहेत. प्रांजल हे जरी मुक्ताईनगरमध्ये खडसे कुटुंबियांसोबत राहत असले तरीही त्यांचे पुण्यात कायमच येणे जाणे सुरू असते अशी माहिती समोर आली आहे.
