AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संपूर्ण मुंब्राचा रंग हिरवा करून… नवनियुक्त नगरसेविकीचे मोठे विधान, महाराष्ट्र हादरुन…

राज्यातील महापालिकेच्या निवडणुका झाल्या असून भाजपा या निवडणुकीत मोठा पक्ष ठरला. मात्र, या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना धक्का बसताना दिसला. त्यामध्येच जितेंद्र आव्हाड हे देखील आहेत. मुंब्रा कायमच जितेंद्र आव्हाडांचा बालेकिल्ला राहिला आहे.

संपूर्ण मुंब्राचा रंग हिरवा करून... नवनियुक्त नगरसेविकीचे मोठे विधान, महाराष्ट्र हादरुन...
Sahar Shaikh
| Updated on: Jan 21, 2026 | 9:13 AM
Share

राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान झाले आणि 16 जानेवारी 2026 रोजी निकाल लागला. भाजपा हा महापालिका निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरला. महापालिका निवडणुकीदरम्यान अनेक घडामोडी घडताना दिसल्या. भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाने युती म्हणून निवडणुका लढवल्या. मात्र, भाजपाची साथ सोडत अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्यासोबत महापालिका निवडणुका लढवल्या. याचा मोठा फटका थेट अजित पवारांना बसला. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मोठी हार स्वीकारावी लागली. सर्वच राजकीय पक्षांनी स्थानिक परिस्थितीनुसार, निर्णय घेत स्वतंत्रपणे लढायचे की, युती म्हणून हे ठरवे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अत्यंत मोठा धक्का या महापालिका निवडणुकीदरम्यान बसताना दिसला. मुंब्रामध्ये कायमच जितेंद्र आव्हाड यांचे वर्चस्व बघायला मिळाले. आता त्यांच्या याच वर्चस्वाला धक्का बसला.

मुंब्रात जितेंद्र आव्हाडांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे वर्चस्व राहिले आहे. अनेक वर्षांपासून राजकीय वलय मुंब्रात जितेंद्र आव्हाडांचे आहे. मात्र, नुकताच झालेल्या महापालिका निवडणुकीत मुंब्रात एमआयएमची एन्ट्री झाल्याचे बघायला मिळतंय. यासोबतच थेट एमआयएमकडून महापालिका निवडणूक लढवून नगरसेविका झालेल्या तरूणीने थेट जितेंद्र आव्हाडांना आव्हान दिले. यासोबतच तिने काही धक्कादायक विधानेही केली.

मुंब्राची नवनियुक्त नगरसेविका सहर शेखने हिने म्हटले की, एमआयएमच्या पतंगचा रंग हिरवा आहे आणि संपूर्ण मुंब्राचा रंग मला हिरवा करून टाकायचा आहे  सहर शेख हिच्या या विधानाने मोठी खळबळ उडाली. जितेद्र आव्हाड यांच्या मतदार संघात महापालिका निवडणुकीत एमआयएमने मोठी मुसंडी मारली. तिने पुढे बोलताना म्हटले की, एमआयएमच्या पतंगामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला.

सहर शेख बोलताना म्हणाली की, मुळात म्हणजे असे आहे की, माझे वडील शरद पवारांच्या राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून सतत पक्षाचे काम करत आहेत. त्यामुळे नक्कीच त्यांना उमेदवारी मिळणे अपेक्षित होते. पण तसे न होता.. अगोदर माझे नाव जाहीर करण्यात आले. मुंब्रात आम्ही सर्वात मोठी रॅली काढली, तरीही आम्हाला पक्षाकडून एबी फॉर्म दिला जात नव्हता. शेवटपर्यंत जितेंद्र आव्हाड उमेदवारी देण्यावर कायम होते. पण त्यांनी शब्द फिरवला.

जर आम्ही जितेंद्र आव्हाडांना आव्हान दिले नसते तर ते चुकीचे ठरले असते आणि अल्लाहला काय उत्तर दिले असते? शेवटपर्यंत जितेंद्र आव्हाड तिकिट देण्याबद्दलच बोलत होते. पण दिले जात नव्हते. शेवटच्या क्षणी माझ्यापुढे अजित पवारांचा एबी फॉर्म होता.. आणि एमआयएमचा देखील पण अजित पवार गट भाजपासोबत असल्याने त्यांचा फॉर्म न घेता मी अल्लाहचा संदेश म्हणून एमआयएम पक्षाचा एबी फॉर्म घेतला.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.