‘सत्याचा धडा देणाऱ्या महात्मा गांधींना अभिवादन’, मनसेकडून उद्धव ठाकरेंना गांधी जयंतीच्या अनोख्या शुभेच्छा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते संदीप देशपांडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत (Sandeep Deshpande on Uddhav Thackeray and Toll Free Maharashtra).

'सत्याचा धडा देणाऱ्या महात्मा गांधींना अभिवादन', मनसेकडून उद्धव ठाकरेंना गांधी जयंतीच्या अनोख्या शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते संदीप देशपांडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत (Sandeep Deshpande on Uddhav Thackeray and Toll Free Maharashtra). आपल्या शुभेच्छांमध्ये संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांच्या निवडणूकपूर्व टोलमुक्त महाराष्ट्राच्या वचनाची आठवण करुन दिली आहे. तसेच सत्याचा धडा देणाऱ्या महात्मा गांधींना अभिवादन म्हणत उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटमध्ये उद्धव ठाकरे यांचा टोलमुक्तीचं वचन देणारा व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे.

संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे, “रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम. सरकार को सन्मती दे भगवान. सत्याचा धडा देणाऱ्या महात्मा गांधीजींना विनम्र अभिवादन.” त्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओत उद्धव ठाकरे निवडणूक प्रचाराच्या सभेला संबोधित करताना सर्वांना आपल्या वचननाम्यात टोलमुक्त महाराष्ट्राचं वचन असल्याचं सांगतात. तसेच आपलं सरकार राज्यात आणि केंद्रात दोन्ही ठिकाणी येणार असून ते आल्यावर महाराष्ट्र टोलमुक्त करु, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.

उद्धव ठाकरे या व्हिडीओमध्ये म्हणाले, “आपलं सरकार आल्यानंतर आपण महाराष्ट्र टोलमुक्त करु. आपलं सरकार आल्यानंतर काय येणारच आहे. केंद्रात पण आपलं सरकार येणार आणि राज्यात पण येणार आहे. आपण वचननाम्यात लिहिलं आहे हे सरकार आल्यानंतर आम्ही महाराष्ट्र टोलमुक्त करणार.”

दरम्यान, संदीप देशपांडे यांनी याआधी देखील उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकासआघाडी सरकारवर सडकून टीका केली आहे. मुंबई लोकल रेल्वे सुरु करावी या मागणीसाठी मनसेने सविनय कायदेभंग आंदोलन केले होते. त्यावेळ गुन्हे दाखल झाल्यानंतर संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंना इशारा दिला होता.

“आम्ही सविनय कायदेभंग आंदोलन लोकहितासाठी केलं. कायद्याची प्रोसिजर ते आता पार पाडत आहेत. मात्र त्यांनी हे लक्षात ठेवावं, ज्यावेळेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं सरकार येईल तेव्हा हा सर्व हिशोब व्याजासकट चुकता होईल. आता जो त्रास देताय ते लक्षात ठेवतोय. त्याची नोंद करुन ठेवतोय” असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला होता.

संबंधित बातम्या :

राज साहेबांचं सरकार आल्यावर व्याजासकट हिशोब चुकता करु, संदीप देशपांडे यांचा इशारा

मुख्यमंत्र्यांकडून हॉटेल्स सुरु करण्याचे संकेत, कर्मचाऱ्यांनी आकाशात उडत कामावर यायचं का? संदीप देशपांडेंचा टोला

वरळीत घराघरात गुडघाभर पाणी, केम छो वरळी, संदीप देशपांडेंनी सेनेला डिवचलं

लोकशाहीत चर्चा करुन मार्ग काढले जातात, डोक्यावर बंदुका ठेवून नाही, संदीप देशपांडेंची टीका

Sandeep Deshpande on Uddhav Thackeray and Toll Free Maharashtra

Published On - 9:03 am, Fri, 2 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI