मोठी बातमी! माजी मंत्र्याचा दोन मुलांसह भाजपमध्ये प्रवेश, कुणाला धक्का?
सांगली जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत त्यांचे दोन सुपुत्र चिमण डांगे आणि विश्वनाथ डांगे हे देखील भाजपमध्ये दाखल झाले आहेत.

सांगली जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत त्यांचे दोन सुपुत्र चिमण डांगे आणि विश्वनाथ डांगे हे देखील भाजपमध्ये दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी अण्णासाहेब डांगे यांचे असंख्य कार्यकर्तेही भाजपमध्ये सामील झाले आहे.
अण्णासाहेब डांगे यांनी यापूर्वी राज्यात काँग्रेसला सत्तेपासून रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत त्यांचे नेतृत्व तयार झाले होते. नंतरच्या काळात त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. मात्र रे राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. मात्र आता पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये परतले आहेत. डांगे यांच्या पक्षप्रवेशामुळे सांगलीत भाजपची ताकद आणखी वाढली आहे. तसेच शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांना या प्रवेशामुळे धक्का बसण्याची शक्यता आहे.
अण्णासाहेब डांगे यांनी सुरुवातीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी काम केले. कालांतराने ते भाजपमध्ये सामील झाले. ते काही काळ मंत्रीही होते, तसेच त्यांनी पक्षात विविध पदे भूषविली आहेत. अण्णासाहेब डांगे यांनी धनगर समाजाच्या आरक्षणासहित अनेक प्रश्नांवर आवाज उठवला होता. तसेच धनगर समाजाच्या आरक्षणातील अडसर ठरलेला धनगर आणि धनगड या शब्दांचा तिढा सोडवण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केला होता.
अण्णासाहेब डांगे हे 1995 साली युतीच्या सरकारमध्ये ग्रामीण विकास मंत्री होते. तसेच ते सांगलीचे पालकमंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात सांगली, मिरज व कुपवाड या तीन शहराची संयुक्त महापालिका स्थापन झाली होती. राज्यात महाविकास आघाडी सत्ता आल्यानंतर डांगे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. चिमण डांगे, विश्वास डांगे हे जयंत पाटील यांच्या नेतृत्वात काम करत होते. मात्र अण्णासाहेब डांगे फ़ार सक्रिय नव्हते.
पूर्वी भाजमध्ये असल्याने अण्णासाहेब डांगे हे भाजपशी जोडले गेले होते. त्यांचे जयंत पाटील यांच्यासह भाजप नेत्यांशीही चांगले संबंध होते. राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर अण्णासाहेब डांगे हे भाजपकडे जाणार अशी चर्चा रंगली होती. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा भाजपचा झेडा हाती घेतला आहे.
