आबासाहेब फिरसे, 94 वर्षीय आमदार गणपतराव देशमुखांसाठी मतदारांचा नारा

अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतरावांनी तब्बल 54 वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले आहे. 2012 मध्ये आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सहभागास 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सभागृहाने तसेच सरकारने त्यांचा गौरव केला होता.

आबासाहेब फिरसे, 94 वर्षीय आमदार गणपतराव देशमुखांसाठी मतदारांचा नारा
Follow us
| Updated on: Sep 29, 2019 | 4:59 PM

पंढरपूर : भारतीय जनता पक्षामध्ये सत्तरी पार केलेल्या उमेदवारांना ब्रेक दिला जात आहे. त्यामुळे अनेक वयस्कर उमेदवारांना घरचा रस्ता धरावा लागत आहे. मात्र याला संपूर्ण देशात अपवाद ठरले आहेत, ते ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख (Sangola MLA Ganpatrao Deshmukh). वयाची नव्वदी पार केलेल्या या 94 वर्षांच्या तरुणाची क्रेझ आजही सांगोला मतदारसंघात पाहायला मिळत आहे. गणपतरावांनी निवडणुकीतून माघार घेऊनही ‘आबासाहेब फिरसे’ असा नारा कार्यकर्तेच नाही, तर प्रत्येक मतदार देत आहे.

आमदार गणपतराव देशमुख यांनी तब्बल अकरा वेळा आमदार होण्याचा मान मिळवत विश्वविक्रम रचला आहे. सांगोला विधानसभा निवडणुकीत 94 हजार 374 मतं मिळवत गेल्या वेळी त्यांनी एकहाती विजय साकारला होता. आमदार देशमुख मागील 54 वर्ष निवडून येत आहेत.

देशमुख 1962 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. 1972 आणि 1995 चा अपवाद वगळता, ते सातत्याने विजयी झाले आहेत. गणपतरावांच्या या विजयामुळे शेतकरी कामगार पक्षाची ताकद सांगोला मतदारसंघात मोठी आहे.

तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम करुणानिधी दहा वेळा विजयी झाले होते. 2009 च्या निवडणुकीत विजय मिळवून करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे देशमुख (Sangola MLA Ganpatrao Deshmukh) हे देशातले दुसरे आमदार ठरले होते. 2014 मध्ये त्यांनी हा विक्रम मोडित एकमेवाद्वितीय होण्याचा मान पटकावला.

अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतरावांनी तब्बल 54 वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले आहे. 2012 मध्ये आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सहभागास 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सभागृहाने तसेच सरकारने त्यांचा गौरव केला होता.

गणपतराव देशमुख हे बहुतांश काळ विरोधी बाकांवरच होते, मात्र 1978 मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापले तेव्हा आणि 1999 मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला तेव्हा, अशा दोन वेळा गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता.

1962 पासून आमदार, गणपतराव देशमुख यंदा निवडणूक लढवणार नाहीत

एक पक्ष एक व्यक्ती एक मतदारसंघ म्हणून सांगोला विधानसभा मतदारसंघाला ओळखले जाते आणि याच मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख हे विजयी होत आलेले आहेत. सर्वाधिक वेळा विधानसभेत निवडून जाण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.

असा हा सांगोला मतदारसंघ 2019 ला आता काय निर्णय घेणार याची उत्सुकता आहे, कारण गणपतराव देशमुख यांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे अनेक नवीन चेहऱ्यांना आमदारकीची स्वप्नं पडू लागली आहेत.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत सांगोला मतदारसंघातून 90 वर्षांचे गणपतराव देशमुख हे जवळपास 25 हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले होते. सांगोला विधानसभा मतदारसंघांमध्ये धनगर समाजाची मतदार संख्या सर्वाधिक आहे. यानंतर मराठा समाज या भागात आहे. यामुळे गणपतराव देशमुख यांना निवडून येणे अधिक सोपं जात होते

सांगोला विधानसभा मतदारसंघातून यंदा आमदार गणपतराव देशमुख (Sangola MLA Ganpatrao Deshmukh) यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर अनेक नवीन चेहरे या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी कामाला लागले आहेत. शेतकरी कामगार पक्षाकडून गणपतराव देशमुख यांचे पुत्र चंद्रकांत देशमुख, भाऊसाहेब रुपनर तर शिवसेनेकडून शहाजीबापू पाटील, भाजपकडून श्रीकांत देशमुख, राजश्री नागणे आणि शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे हेही विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे राहण्यास इच्छुक आहेत.

आतापर्यंतचा इतिहास पाहता गणपतराव देशमुख जो आदेश देतील त्याच्याच मागे इथली जनता जाते. मात्र गणपतराव देशमुख यावेळी निवडणुकीत नसल्यामुळे दीपक साळुंखे, शहाजीबापू पाटील किंवा इतर विरोधक जोरदार प्रयत्न करुन शेकापचा हा गड शिवसेनेकडे घेण्याचा जोरदार प्रयत्न करत आहेत.

Non Stop LIVE Update
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.